मंगरुळपिर
आज धकाधकीच्या जीवनात सर्वांनाच मन:शांती हवी आहे. मन:शांतीसाठी लोकं पुण्य करतात. मन:शांतीसाठीच पैसे कमावतात. मन:शांतीसाठीच दान करतात. पण या कशातूनच त्यांना शांती मिळत नाही. त्यांचा स्वत:वरचा अहंकार हळूहळू तुटत जातो. पण तरीही त्यांना शांतता मिळत नाही.माणसाकडचे सगळे काही संपून जाते.मात्र गो-धन असे धन आहे की ते केव्हाच संपत नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी ता २५ रोजी येथील केशव गोरक्षण येथे आयोजित कार्यक्रमात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते लक्ष्मीकांत महाकाळ हे होते सत्कार मूर्ती म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,प्रमुख उपस्थिती मध्ये ओमप्रकाश बंग,ऍड बी एम ठाकरे,ऍड राठी हे होते,पुढे बोलताना चंद्रकांत ठाकरे म्हणाले की गो-धन ही मनुष्याची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि गो-धन हे मानवाला देवाने सगळ्यात मोठे धन दिलं आहे. ते धन कोणत्याही इतर संपत्तीहून अधिक आहे. पण मानवाला त्याची किंमतच नाही. ते धन आहे वेळेचं धन. माणून अनेक विवंचनांमध्ये स्वत:चा वेळ घालवत असतो. शांतीसाठी तीर्थक्षेत्र धुंडाळत असतो. गंगातीर गाठत असतो. पण तो हे जाणत नाही की गोमाताच्या रुपात एक गंगा त्याच्या आतच वाहते आहे. एक तीर्थक्षेत्र त्याच्या आतच वसले आहे. जगातला सगळ्यात मोठा आनंद कुठे बाहेर नाही तर गोमातेची सेवा करण्यात आहे.केशव गोरक्षण हे सर्वांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्या वजना इतके पाच प्रकारच्या डाळी व ढेप येथील गोमातांना खाण्यासाठी देण्यात आल्या तर केशव गोरक्षण कडून एक चांदीची गाय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचा सत्कार करून भेट स्वरूपात देण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता गजेंद्र बजाज,संतोष बियाणी,पुरुषोत्तम चितलांगे,सतिष बाहेती,हरिष बाहेती,नंदलाल जाखोटीया, गिरीष बाहेती,मनोज छल्लानी,गोपाल मुंदडा,साकेत लांडे,तानाजी काका,बाळू पाटील,भास्कर पाटील, सुनील भुतडा यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा सुधीर घोडचर यांनी केले तर आभार सुनील मालपाणी यांनी केले
अल्पोपहारा नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Comments