प्रतिनिधी । कारंजा (लाड)
कारंजा नगर परिषद अंतर्गत २ कोटी ७० लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन दि.२९ मे रोजी राष्ट्रवादीचे नेते मो.युसूफ पुंजानी, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, युवा नेते देवव्रत डहाके यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात संपन्न झाले.
कारंजा शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मो.युसूफ पुंजानी, दत्तराज डहाके व देवव्रत डहाके यांनी विशेष प्रयत्न करून विविध योजने अंतर्गत १० कोटींचा निधी खेचुन आणला आहे. त्या मधून आज २ कोटी ७० लाख रुपयाच्या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. ज्या मध्ये रेल्वे गेट ते नागपुर- औरंगाबाद हाइवे पर्यंत नाला बांधकाम करणे, गौतमनगर , शांतिनगर येथील विविध ५ विविध प्रकारच्या बांधकाम व नाला बांधकाम करणे. मूर्तिजापुर रोड वरील श्री राठोड घर से तुलजाभवानी नगर जोड रस्ता व नाली बांधकाम करणे, शांतिनगर- पंडित मेश्राम घर ते समृद्धि नगर नाला बांधकाम करणे, गौतमनगर ते शांतिनगर पंडित मेश्राम घरापर्यंत नाला बांधकाम करणे, प्रियदर्शनी कॉलोनी येथील बौद्ध विहाराची संरक्षण भिंतचे बांधकाम करणे, आकाशदीप कॉलोनी येथील श्रीकृष्ण मूंदे यांच्या घरापासून ते रामराव सावंत घर ते अमोल मूंदे घर ते रमेश शंकरपुरे यांच्या घराजवळ रस्ता बांधकाम करणे आदी कामासह विविध कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी माजी उपाध्यक्ष जुम्मा पप्पूवाले, माजी उपाध्यक्ष एम.टी.खान माजी गटनेते ऍड.फिरोज शेकूवाले, माजी नगरसेवक सैय्यद मुजाहिद, जावेदोद्दीन शेख, जाकीर शेख, सलीम गारवे, नितीन गढवाले, इरफान खान, युनूस पहेलवान, अब्दुल एजाज, अब्दुल राशीद, सलीम प्यारेवाले, राजू इंगोले, चाँद मुन्नीवाले, हुसेन बंदूकवाले, उस्मान खान, एड. मिलिंद खंडारे, मुजाहिद खान, सदीम नवाज, वहिद शेख, नईम पहेलवान, मोहम्मद शेकूवाले, फईम टेलर, लल्लू गारवे, हाजी फारुख पोपटे, आरिफ पठाण, महेबूब लंगे, शकील चौधरी, रज्जाक फकिरावाले आदींसह बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.
0 Comments