महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसार माध्यमाला कळवीले की, "आधुनिक गाडगे बाबा" म्हणून वाशिम जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात नाव लौकिक मिळवून विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करणारे "पी. एस.खंदारे" यांचा विशेष सत्कार पालक मंत्री मा. ना.शंभूराजे देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला.
१ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन तथा जिल्हा परिषदेच्या हिरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून
वाशिम जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग वाशिम च्या वतीने वाशिम जिल्ह्यातील सर्व गावागावात "तुझं गावच नाही का तिर्थ" हे स्वच्छता व हागनदरी मुक्त गाव आणि घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी प्रबोधन रथाच्या माध्यमातून महत्वाकांक्षी अभियान राबविण्यात आले. या अभियानात सामाजिक कार्यकर्ते तथा अशासकीय सदस्य जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिम चे कार्याध्यक्ष पी एस खंदारे यांनी निष्काम कर्मयोगी संत गाडगे बाबांच्या वेशभूषा करून वाशिम जिल्ह्यातील गावागावात जाऊन वाशिम जिल्ह्यातील एकसे सत्याहत्तर गावात निष्काम कर्मयोगी संत गाडगे बाबांच्या वेशभूषा करून स्वच्छता करत समाज प्रबोधन व स्वच्छता जनजागृती आणि कोरोणा व अंधश्रद्धा निर्मूलन आणि शिक्षणाचे महत्व विषयांवर जिल्हा परिषद कडून कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता सलग दोन महिने स्वच्छता रथा सोबत गावा गावातून जनजागृती केली म्हणून वाशिम जिल्हा पालक मंत्री मा. ना.शंभूराजे देसाई यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे व जिल्हा परिषद मुख्याधिकारी तथा जिल्हा अधिकारी वसुमना पंत, आमदार अमित भाऊ झनक व आमदार किरणराव सरनाईक,सुरेशभाऊ मापारी, जिल्हा परिषद सदस्य व सर्व अधिकार ,कर्मचारी यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ मोठ्या थाटात साजरा झाला.
या वेळी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस चे विदर्भ विभागीय उपाध्यक्ष राजीव दारोकार, नीलेश भोजणे,दतराव वानखेडे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. अंधश्रद्धा निर्मुलना करीता पारदर्शी कार्य करणाऱ्या कलावंत पि एस खंदारे यांचे विदर्भ लोककलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांनी व कारंजा येथील मित्र परिवाराने हार्दिक अभिनंदन केले आहे .
0 Comments