15/5/2022 रोजी घेण्यात आलेल्या गुगल मिटिंग मध्ये खालील विषयावर विविध भागात कार्य करणाऱ्या ज्येष्ठ महिलांनी व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले .पण बदल कधी होणार?
आज हे कडक नियम काही देशात किंवा काही समाजातच नाही तर सर्वच समाजातील विधवांसाठी शापासारखे आहेत. ज्यातून तिला मात करून तिच्या जीवनाचा उद्देश शोधायचा आहे. पण धर्मग्रंथ आणि धर्माच्या नावाखाली हा समाज क्वचितच एखाद्या विधवेला स्वातंत्र्याची पायरी चढू देतो.आजच्या आधुनिक युगात हे सर्व कुठे घडते ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आजकाल पतीच्या निधनानंतर , आजही देशाच्या अनेक भागात विधवा महिलेला ओझे समजून घराच्या कोपऱ्यात टाकले जाते.
पतीच्या मृत्यूनंतर तिचे जीवन निरर्थक आहे, असे तिला वाटू लागले आहे. पण का? विधवेकडून तिचा हक्क, बांगड्या मंगळसूत्र तिचा रंग आणि मेकअप काढून घेण्यात काय अर्थ आहे? आमचे धर्मग्रंथ आम्हाला याबद्दल सल्ला देतात का?
वेद दुसऱ्या लग्नाची शिफारस करतात
म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या विधवेने आयुष्यभर त्याच्या स्मरणार्थ घालवावे,आणि पत्नी च्या मृत्यू नंतर पती ने दुसरे लग्न करायचे, असे कोणताही धर्म सांगत नाही. त्या स्त्रीला सुद्धा पुढे जाण्याचा आणि दुसऱ्या पुरुषाशी लग्न करून आपले जीवन यशस्वी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मग तिने त्याच्या पतीच्या नावाने कुंकू लावणे मंगळसूत्र घालने हा काही गुन्हा नाही . आजच्या या सभे मध्ये
जिल्हानिहाय कमिटी स्थापन करणे
,थांब लक्ष्मी कुंकू लावते ह्या सारख्या उपक्रमाची रूपरेषा ठरवणे,
जिल्हा कमिटी कडून स्थानिक खासदार आणि आमदारांना निवेदन देउन या अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणण्यासाठी दबाव गट म्हणून काम करणे.
तसेच नियुक्ती झालेल्या जिल्हाध्यक्ष यांच्या या कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या मुद्दे व भूमिका मांडणी करण्याच्या हेतूने ही सभा घेण्यात आली या सभेकरिता आधुनिक युगाचे विचार घेऊन कालिंदिताई ढुबे पाटील राज्य समन्वयक कोल्हापूर,
विनिताताई दिवेकर प्रदेश सचिव पुणे , रेवतीताई आढाव राज्य महासचिव वाशी, नवी मुंबई, चित्राताई गायकवाड नवी मुंबई, नंदाताई डेरे नवी मुंबई , वंदनाताई अंभोरे , नवी मुंबई
जयश्री कारंडे नवी मुंबई, मंदाकिनीताई पाटील पूणे,मीनाक्षी ताई चौगुले नवी मुंबई, सविता ताई मोरे वाशीम, स्मिताताई गवळी पनवेल रायगड, वंदनाताई चिंचोळकर नवी मुंबई, अनिता ताई कांबळे बीड, युवराज शहापूरकर समाज सेवक बीड , दत्ता खरे समाजसेवक, सुधाकर चौधरी वाशिम खबर आवाज महाराष्ट्र चे संपादक वाशिम. इत्यादी महिला भगिनींनी सहभाग नोंदवला होता.
उज्वला साळवे वाशी नवी मुंबई ,मीना शेळके वाशी नवी मुंबई
, प्रेमलता सोनवणे बीड
, मीनल कुडाळकर,
शंकर तांबे , इतर जिल्ह्यातील
तांत्रिक समस्येमुळे मीटिंगमध्ये सहभागी होऊ शकले नाही. कालिंदिताई पाटील यांनी पुढील कार्यास शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
0 Comments