Ticker

6/recent/ticker-posts

गुन्ह्यांचा उत्कृष्ट तपास करून ते उघडकीस आणून गुन्हे प्रतिबंध करणे व दोष सिद्धी साठी विशेष प्रयत्न करणाऱ्या ६ अधिकारी व २६ अमलदारांचा पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS)यांच्या हस्ते सत्कार

वाशिम जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम वाशिम जिल्हा पोलीस दल यशस्वीपणे करत आहे. त्या पार्श्वभूमीवर दि. १२.०५.२०२२ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय येथील सभागृहात सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांच्या आढावा बैठकीचे आयोजन पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या रामनवमी व रमजान ईद ह्या शांततेत पार पडण्याकामी वाशिम जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांनी विशेष मेहनत घेतली व बंदोबस्त यशस्वीरीत्या पार पडला त्याबद्दल पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी सर्वांचे कौतुक केले. जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण

समितीचे डॉ. पांढरकर व पथकाने तंबाखूजन्य पदार्थाचा गैरकायदेशीर वापर, कोटपा कायद्यांतर्गत प्रकरणे व उपाययोजना

याबाबत उपस्थितांना माहिती दिली.

सदर मासिक आढावा बैठकीमध्ये S.E.V.A. Service Excellence & Victim Assistance या अभ्यागतांच्या समस्या जाणून घेऊन त्याची नोंद घेत त्या समस्यांचे निराकरण करत अभ्यागतांना उच्च प्रतीची चांगली सेवा पुरविणाऱ्या प्रणालीबाबत उत्कृष्ठ सादरीकरण करण्यात आले. तसेच DPDC निर्धीतर्गत वाशिम जिल्हा पोलीस घटकातील 'निर्भया पथक महिला अंमलदार यांचेसाठी गस्त करणे सोयीचे व्हावे यासाठी प्राप्त १५ दुचाकी वाहनांचे लोकार्पण मा. पालकमंत्री ना. श्री. शंभूराजे देसाई यांच्याहस्ते ०१ मे महाराष्ट्र दिनी झाले. त्यामुळे महिलांच्या व मुलींच्या सक्षमीकरणासाठी व सुरक्षिततेसाठी 'निर्भया पथक' अधिक सक्षम झाले असून येत्या काळात निर्भया पथकाच्या प्रभावी कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अनधिकृत भोंगे व लाऊडस्पीकरबाबतही चर्चा करण्यात आली व मा. सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन तंतोतंत करण्यासंदर्भात सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.
त्यानंतर केकतउमरा येथील पुजाऱ्याच्या खून प्रकरणाचा उत्कृष्ट तपास करत सदर गुन्हा २४ तासांचे आत उघडकीस आणला त्याबद्दल पो.स्टे. वाशिम ग्रामीणच्या परिविक्षाधीन सहा. पोलीस अधीक्षक महक स्वामी (IPS) व त्यांचे पथकाचा, स्थानिक अल्लाड़ा प्लॉटवरील रस्त्यावर व्यापायास अडवून १७ लाख रुपयांची जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस ३६ तासांचे आत अटक तसेच रिसोड, मंगरूळपीर, मालेगाव येथे जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांचेकडून ७ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदारांचा, तसेच राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या पैरवी अधिकारी व अंमलदारांचा, त्याचबरोबर जनसंपर्क अधिकारी कार्यालयात उत्कृष्ठपणे काम करणारे अंमलदार पो.कॉ. विठ्ठल सुर्वे असे एकूण ०६ अधिकारी व २६ अंमलदार यांचा सत्कार मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

Post a Comment

0 Comments