Ticker

6/recent/ticker-posts

अवैधरीत्या राशनच्या तांदळाची साठवणूक व विक्री करणाऱ्यावर कारंजा शहर पोलिसांची धाड व 22.73 क्विंटल तांदूळ किंमत अंदाजे 33600/- रु. व सोबत आपे ऑटो किंमत अंदाजे 50,000/- रुचा असा एकून 83600/-रुचा मुद्देमाल जप्त


शासकीय वितरण प्रणालीतील धान्य विक्री करणे किया साठवणूक करण्यावर व काळाबजारी करण्यावर शासनाने फायदा

करून प्रतिबंध घातला आहे. असे असले तरी काहीजण चोरून लपून शासकीय वितरण प्रणालीतील धान्य विक्री करणे किंवा

साठवणूक करून काळावजारी करत असतात. त्यांच्यावर मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली व

नेतृत्वाखाली कायद्याचा बडगा उगारत कारवाईचा सपाटा सुरु आहे.


पो.स्टे. कारंजा शहर बीट मार्शल 02 हे पो.स्टे. हद्दीत गस्त करत असतांना रिलायन्स पेट्रोलपंप जवळ एक तीन चाकी अंपे क्रमांक MH 37 B 192 संशयित रित्या काहीतरी वाहतूक करतांना दिसून आल्याने पो.स्टाफ त्यास थांबवून आटो ची पाहणी केली असता त्यामध्ये पांढरे पिवळे अशा प्लास्टिक फट्ट्या मध्ये तांदूळ दिसून आला, त्यावरून आटो चालकास नमूद तांदूळ कुठे घेवून चाललास? कोठून हा तांदूळ आणलास असे विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्ली, वरून नमूद आटोचालकास आटोसह पोलीस स्टेशनला आणले आणी त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव राजा शहीद गोचीवले वय अंदाजे 19 वर्ष रा. कोळी ता. कारंजा जिल्हा वाशिम असे सांगितले, नमूद आटो चालकास पुन्हा विश्वासात घेवून नमूद तांदुळाविषयी विचारपूस केली असता, त्याने सांगितले कि "मी गावो गावी खेडोपाडी फिरून लोकांकडून तांदूळ विकत घेतो त्या बदल्यात त्यांना पैसे देतो, आणी तांदूळ माझ्या अंगणात जमा करून ठेवतो नमूद तांदूळ माझ्या कडून घेणारे घेवून जातात तरी त्यास अधिक माल कुठे आहे असे विचारले असता त्याने सांगितले कि माझ्या घराच्या अंगणात झाकून ठेवले आहे. अशा माहिती वरून आम्ही पो. स्टाफ गाव कोळी ता. कारंजा येथे गेलो, आणि नमूद इसमाने त्याचे घर दाखवले असता त्याचे घराचे अंगणात वेगवेगळ्या रंगाचे तांदळाचे कट्टे मिळून आले, ज्या मध्ये काही अर्थ तर काही भरलेले होते, नमूद कट्टे पंचासमक्ष जप्त फरून पो.स्टे आणले आणि शासन जमा केले आहेत. पो.स्टे.

कारंजा शहर येथे आरोपीविरुद्ध फलम 37 अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु

आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस उपविभागीय अधिकारी कारंजा श्री. जगदीश पांडे, ठाणेदार श्री. अधारसिंग सोनोने यांचे नेतृत्वाखाली सपोनि प्रशांत जाधव, पोहेकाँ चरण चव्हाण, नापोकों, अनिल राठोड, पोकों, फिरोज खान, पोकों, पवन जाधव, पोका, रोहन तायडे यांनी सदरची कामगिरी पार पाडली.

Post a Comment

0 Comments