Ticker

6/recent/ticker-posts

पंचायत समिती सदस्य सौ मीनाताई राऊत यांच्या मागणीला यश

पं स सदस्या सौ राऊत यांनी केली होती मागणी त्या' शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार
मंगरूळपीर :- नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला असून पंचायत समिती सदस्य सौ मीनाताई राऊत यांच्या मागणीला यश आले आहे.
                    तालुक्यातील नियमित कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासना तर्फे प्रोत्साहनपर रक्कम देणे जाहीर करण्यात आले होते. परंतू मंगरूळपीर तालुक्यातील शेतकऱ्यांना आजपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान रक्कम प्राप्त झाली नाही .त्यामुळे शासना तर्फे मिळणारी प्रोत्साहनपर रक्कम लवकरात लवकर मिळावी.अशी मागणी पं स सदस्य सौ मीनाताई राऊत यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचे मार्गदर्शनात मुंबई येथे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांना निवेदन देऊन केली होती.यावर नुकताच शासनाने निर्णय घेतला शेतकऱ्यांना सदरचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे सौ राऊत यांच्या मागणीला यश आले आहे.

Post a Comment

0 Comments