Ticker

6/recent/ticker-posts

न्यायालयीन निर्णयानंतर राजकीय हालचालींना गती

    सर्वोच्च न्यायालयाचे उत्तर

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेला सत्तेचा सारीपाट अद्याप संपण्याची चिन्ह दिसत नाही . त्यात सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसीसंदर्भात उत्तर देण्यासाठी १२ जुलैपर्यंत मुदत दिल्यामुळे हे राजकीय महानाट्य अजून लांबण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

 दरम्यानच्या काळात भाजपाकडून सावध पवित्रा घेतला जात असला, तरी देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप यावर सविस्तर भूमिका स्पष्ट केलेली नसल्यामुळे भाजपाच्या गोटात नेमकं काय चाललंय, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. 

एकनाथ शिंदेही दिल्लीला जाण्याची शक्यता

सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेदेखील दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. गुवाहाटीत बंडखोर आमदारांसोबत बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे रवाना होण्याची शक्यता आहे. बैठकीदरम्यान यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांची देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक होऊ शकते अशी चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments