दिसते की काही माणसांची एका बाजूला डोळे बंद करून मंदीरात पूजा चालू असते व दुसऱ्या बाजुला आपल्या शेजाऱ्याची जमीन आपल्या ताब्यात कशी येईल याचा मनात विचार चालु
असेल किंवा व्याजाने दिलेल्या पैशाचे एक वर्षाचे व्याज येणे बाकी आहे, असे विचार चालू असतील तर अशा पूजेने तो आनंद मिळणार नाही. ईश्वर भावाचा भुकेला आहे. त्याला पूजा करणाऱ्यांचा भाव पाहिजे. काही माणसं देहभान विसरून भक्ती भावाने पूजा करतात, ती खरी पूजा आहे. स्वामी विवेकानंदांच्या या विचारांचा 'गांधीजींच्या खेड्यांकडे चला' या विचारांचा माझ्या जीवनावर पडलेला प्रभाव यामुळे वयाच्या 25 व्या वर्षी भर तारूण्यातच मी माझ्या संपूर्ण जीवनाचे ध्येय ठरविले की आता जीवनात गावाची, समाजाची, देशाची सेवा निष्काम भावनेने करायची. सेवेचा अर्थ फळाची अपेक्षा न करता निष्काम भावनेने केलेले कर्म. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' संपूर्ण जीवनाचे ध्येय निश्चित केले.
1965 च्या लढाईतील खेमकरणमध्ये झालेला हवाई हल्ला माझ्या जीवनावर झालेला प्रभाव आणि महात्मा
1963 मध्ये सैन्यात भरती झाल्यानंतर दोनच वर्षात 1965 साली भारत-पाकिस्तानच्या खेमकरणाच्या सीमेवर पाकिस्तानच्य दुश्मनांनी आमच्यावर हवाई हल्ला केला. त्या हल्ल्यात माझ्या बरोबरचे माझे सहकारी शहीद झाले. मी चालवित असलेल्या गाडीवर 25 ते 30 गोळ्या लागल्या. गोळ्यांमुळे •गाडीचे पुढचे टायर बस्ट झाले. गाडीच्या समोरच्या काचेवर तीन गोळ्या लागल्या, पण त्यातून मी वाचलो. आजूबाजूला सर्व रक्त सांडले होते. त्यामुळे विचार निर्माण झाले की एवढ्या मोठ्या प्रमाणात गाडीवर गोळ्या लागूनही आणि बरोबरचे माझे सहकारी शहीद झाले असूनही आपण वाचलो त्या अर्थी ईश्वराची आपणाकडून काही तरी करून घेण्याची इच्छा असावी
आर्मीतील फोटो
त्या आधी स्वामी विवेकानंद, महात्मा गांधीजींची पुस्तके वाचण्यात आली होती. त्यांच्या विचाराचा जीवनावर प्रभाव पडला होता. त्यामुळे भारत पाकिस्तान सिमेवरील खेमकरण सिमेवर जिथे ही घटना घडली तिथे माझा निर्णय झाला. माझ्या बरोबरचे सर्व सहकारी शहीद झाले आणि आपणच वाचलो. हा आपला पुनर्जन्म झाला आहे. आता हा नवीन जन्म फक्त गाव, समाज आणि देश सेवेसाठीच अर्पण करण्याचा निर्णय झाला. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम अशा अवस्थेत गावची, समाजाची सेवा करण्यासाठी
१
हाताशी काहीच येत नाही. संपूर्ण जगावर राज्य करणारा सिकंदर महान, पण एक दिवस तोसुद्धा रिकाम्या हातानेच गेला. त्याने जाताना लोकांना सांगितले की मी जगावर राज्य केले असले तरी जाताना रिकाम्या हातानेच चाललो आहे. काहीच घेऊन चाललो नाही. माणसं का जगतात ? या प्रश्नाचे उत्तर मला मिळत नव्हते. मी अनेकांना हा प्रश्न विचारीत राहिलो, पण उत्तर मिळत नाही म्हणून मी एक दिवस एकांतपणे बसून ठरविले की आत्महत्या करून जीवन संपवून टाकायचे. जर हे माहित आहे की रिकाम्या हातानेंच जायचे आहे तर जगायचे कशासाठी ? आजच गेलेले काय वाईट? जीवनात कोणतेही संकट नव्हते, माझ्या जीवनात कोणत्याही अडचणी आल्या नव्हत्या फक्त जीवनाचा अर्थ कळत नव्हता म्हणून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. योगायोग असा की दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवरील बुक स्टॉलवर एका छोटाशा पुस्तकावरील स्वामी विवेकानंद यांचे चित्र आकर्षक वाटले म्हणून मी ते एक पुस्तक विकत घेतले. वाचायला सुरूवात केली आणि जीवनाचा धागा हाताशी आला. स्वामी विवेकानंद यांची आणखी पुस्तके वाचत गेलो. स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण विचार समजणे सोपे नाही. माझ्या सारख्या अल्पशिक्षित माणसाला तर शक्यच नाही. पण स्वामी विवेकानंदांच्या विचारातून मला एक गोष्ट समजली की प्रत्येक माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माझे माझे म्हणत पळतो आहे. कारण तो आनंदाच्या शोधात लागला आहे. माणसाला क्षणिक आनंद नको, त्याला अखंड आनंद हवा आहे. त्या आनंदात खंड पडू नये असा अखंड आनंद माणसं शोधतात. एका बाजूला आनंदाच्या शोधात आहे. तर दुसरीकडे काही माणसं एअर कंडिशन मध्ये राहतात. पण झोप लागत नाही म्हणून रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन झोपताना दिसतात. कारण विवेकानंद म्हणतात अखंड आनंद बाहेरून मिळणार नाही तर अखंड आनंद आपल्या आतूनच मिळत असतो. जे दुःखी पीडित लोक आहेत, रंजले गांजलेले लोक आहेत अशा माणसांची सेवा हीच खरी ईश्वराची पूजा आहे. अशा पूजेमधून अखंड आनंद माणसाला मिळत असतो. मात्र अशी सेवा निष्काम भावनेने करावी. कोणतीही अपेक्षा ठेवून केलेल्या कार्याने तो अखंड आनंद मिळणार नाही. आनंद मिळेल पण क्षणिक आनंद मिळेल. अखंड आनंद मिळणार नाही, हे मला विवेकानंदांच्या विचारातून कळत गेले. आनंदासाठी काही वेळेला बरीच माणसं दररोज मंदिरातील पूजा करीत असताना दिसतात. पूजा करणे हा दोष नाही. मी मंदिरातच राहतो. मी आळंदीमध्ये ज्ञानेश्वरांच्या समाधीवर तुळशीची माळ ठेवून गळ्यात घातली आहे. पण त्या माळेचा मी फक्त जप करत नाही. जप करता करता यश-अपयशाची चिंता न करता फळाची अपेक्षा न करता निष्काम भावनेने केलेले प्रत्येक कर्म हाच माझा अखंड जप चाललेला आहे. पण काही वेळेला असेही
२
दिसते की काही माणसांची एका बाजूला डोळे बंद करून मंदीरात पूजा चालू असते व दुसऱ्या बाजुला आपल्या शेजाऱ्याची जमीन आपल्या ताब्यात कशी येईल याचा मनात विचार चालु असेल किंवा व्याजाने दिलेल्या पैशाचे एक वर्षाचे व्याज येणे बाकी आहे, असे विचार चालू असतील तर अशा पूजेने तो आनंद मिळणार नाही. ईश्वर भावाचा भुकेला आहे. त्याला पूजा करणाऱ्यांचा भाव पाहिजे. काही माणसं देहभान विसरून भक्ती भावाने पूजा करतात, ती खरी पूजा आहे. स्वामी विवेकानंदांच्या या विचारांचा 'गांधीजींच्या खेड्यांकडे चला' या विचारांचा माझ्या जीवनावर पडलेला प्रभाव यामुळे वयाच्या 25 व्या वर्षी भर तारूण्यातच मी माझ्या संपूर्ण जीवनाचे ध्येय ठरविले की आता जीवनात गावाची, समाजाची, देशाची सेवा निष्काम भावनेने करायची. सेवेचा अर्थ फळाची अपेक्षा न करता निष्काम भावनेने केलेले कर्म. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' संपूर्ण जीवनाचे ध्येय निश्चित केले.
1965 च्या लढाईतील खेमकरणमध्ये झालेला हवाई हल्ला माझ्या जीवनावर झालेला प्रभाव आणि महात्मा
1963 मध्ये सैन्यात भरती झाल्यानंतर दोनच वर्षात 1965 साली भारत-पाकिस्तानच्या खेमकरणाच्या सीमेवर पाकिस्तानच्य दुश्मनांनी आमच्यावर हवाई हल्ला केला. त्या हल्ल्यात माझ्या बरोबरचे माझे सहकारी शहीद झाले. मी चालवित असलेल्या गाडीवर 25 ते 30 गोळ्या लागल्या. गोळ्यांमुळे गाडीचे पुढचे टायर बस्ट झाले. गाडीच्या समोरच्या काचेवर तीन गोळ्या लागल्या, पण त्यातून मी वाचलो. आजूबाजूला सर्व रक्त सांडले होते. त्यामुळे विचार निर्माण झाले की एवढ्या मोठ्या प्रमाणात गाडीवर गोळ्या लागूनही आणि बरोबरचे माझे सहकारी शहीद झाले असूनही आपण वाचलो त्या अर्थी ईश्वराची आपणाकडून काही तरी करून घेण्याची इच्छा असावी!
आर्मीतील फोटो
त्या आधी स्वामी विवेकानंद, महात्मा गांधीजींची पुस्तके वाचण्यात आली होती. त्यांच्या विचाराचा जीवनावर प्रभाव पडला होता. त्यामुळे भारत पाकिस्तान सिमेवरील खेमकरण सिमेवर जिथे ही घटना घडली तिथे माझा निर्णय झाला. माझ्या बरोबरचे सर्व सहकारी शहीद झाले आणि आपणच वाचलो. हा आपला पुनर्जन्म झाला आहे. आता हा नवीन जन्म फक्त गाव, समाज आणि देश सेवेसाठीच अर्पण करण्याचा निर्णय झाला.
घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम. अशा अवस्थेत गावची, समाजाची सेवा करण्यासाठी
३
सैन्यातून परत यायचे तर आपला उदरनिर्वाहाचा बोजा कोणावर तरी घरच्या किंवा बाहेरच्या लोकांवर राहील. कारण उपाशी पोटी सेवा कशी करणार ? चरितार्थ चालविण्यासाठी साधन असणे आवश्यक आहे. कारण सैन्यामध्ये 1963 ते 1965 फक्त दोन वर्षांचीच सेवा झाली होती. त्यामुळे मला पेन्शन मिळणार नव्हती. अशा परिस्थितीत गाव, समाज, देशाची सेवा करण्यासाठी सैन्यातून परत जाणे मला अवघड वाटू लागले. म्हणून किमान 15 वर्षे देशाची सेवा घडावी आणि पेन्शनचा हकदार झाल्यानंतर पेन्शन सुरू होईल. उदरनिर्वाहाचे साधन निर्माण झाल्यानंतर घरच्या किंवा बाहेरच्या कोणावर आपल्या चरितार्थाचा बोज राहणार नाही. म्हणून मी 15 वर्षे सैन्यातील देश सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर लग्न न करण्याचाही निर्णय घेतला. लग्न केले तर चूल आणि मूल यामध्येच जीवन जाईल. मग गाव, समाज, देशाची सेवा करता येणार नाही. हा मला धोका दिसू लागल्याने लग्न करायचे नाही, अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. आता जोपर्यंत जगायचे ते गाव, समाज, देशासाठीच जगायचे आणि ज्या दिवशी मरायचे आहे ते गाव, समाज, देशसेवा करता करताच मरायचे आहे. असा माझा निर्णय पंजाब - पाकिस्तानच्या खेमकरण सिमेवर झाला. वयाच्या 25 व्या वर्षी भर तारूण्यात घेतलेला तो निर्णय आज वयाच्या 82 वर्षाच्या वयातही कायम आहे. ही ईश्वराची माझ्यावर झालेली कृपाच आहे असे मानतो. कारण अविवाहित राहून समाजात कार्य करीत राहणे हे सोपे नाही, पण ईश्वराने कृपा केली गाडीमध्ये लागलेल्या गोळ्या म्हणून जीवनात 82 वर्षांच्या वयात तीळाएवढाही दाग लागू न देता मनाला लगाम लावण्याची शक्ती मिळत गेली.
बर्फात असताना
सैन्यात असताना पंजाब, हिमाचल प्रदेश, सिमल्याच्या पुढे चीन सिमेपर्यंत टापरी, शुगर सेक्टर, पू. च्या सीमेवर राहण्याचा योग आला. सिक्कीम, भूतान, आसाम, मिझोराम, तेजपूर, धवांग, तवांग, पश्चिम बंगाल, काश्मीर या भागात राहण्याचा योग आला. एकूण सेवेच्या 12 वर्षात सहा वर्षे 14 हजार फूट उंची वर बर्फात राहण्याचा योग आला. त्यामुळे हिमालयातील पश्चिम बंगाल पासून आसाम, नागालँड, सिक्कीम, भूतान, हिमाचल, उत्तराखंड अशा मोठ्या प्रमाणावर भौगोलिक, सामाजिक स्थिती पाहण्यास मिळाली. त्यामुळे माझा अनुभव वाढण्यास मदत झाली. हिमालयामध्ये काही ठिकाणी बर्फामुळे डिझेल तुपासारखे घट्ट
४
जमत होते. अशा वेळी गाडीच्या डिझेलच्या टाकीखाली उष्णता निर्माण करावी लागे. हळूहळू डिझेल वितळल्यानंतर उताराच्या दिशेने गाडी गिअर मध्ये 2 ते 3 कि.मी. गेल्यानंतर चालू होत असे. हे प्रत्यक्ष अनुभव वाढत गेले. बर्फात असताना, गाडी स्लिप होऊ नये यासाठी गाडीच्या टायरांना नॉन-स्किड चैन लाऊन गाडी चालवावी लागे. आपला देश कायद्यांच्या आधारने चाललेला देश आहे. देशातील संसदेत झालेल्या कायद्यांपेक्षा सैन्याचे कायदे वेगळे असतानासुद्धा जवानांच्या हितासाठी मी वरिष्ठांशी अनेकदा संघर्ष करीत असे. कंपनीचा दरबार, बटालियन दरबार मध्ये नेहमी जवानांच्या हिताचे प्रश्न उपस्थित करीत असे. त्यामुळे सैन्यात शिपायापासून वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण माझा शास्त्रीजी या नावानेच उल्लेख करीत असत. पूर्वी राजे, महाराजे असताना दरबार भरायचे. कोणालाही काही अडचणी असल्या तर त्या दरबारात मांडल्या जात असत आणि त्या अडचणी सुटत असत. तीच पद्धती सैन्यात आजही चालू आहे. काही वेळेला जवानांच्या हितासाठी वरिष्ठांच्या विरोधात प्रश्न विचारल्यामुळे अचानक हिमालयाच्या कठीण भागात माझी बदली होत होती. पण मी देश सेवेसाठी कुठेही जाण्याची तयारी ठेवली होती. कारण देशाची सेवा करण्याचे व्रत घेतले होते. मिझोराम मध्ये एकदा हल्ल्यामधून वाचलो होतो. सैन्यातील 12 वर्षांचा प्रवास म्हणजे फार खडतर प्रवास होता. 12 वर्षांचा सैन्यातील अनुभव लिहायचे ठरवले तर स्वतंत्र पुस्तक तयार होईल. एवढा मोठा खडतर प्रवास होता की शब्दाने व्यक्त होणार नाही. मात्र जवानाने आपल्या संपूर्ण जीवनाचे ध्येय निश्चित केले तर जे अवघड असते ते सोपे होऊन जाते. याचा अनुभव आला.
खेमकरण सीमा
• माझ्या संपूर्ण जीवनाला कलाटणी मिळाली ती सैन्यातील 1965 च्या पाकिस्तानच्या खेमकरणाच्या लढाईमुळेच. हवाई हल्ल्यामुळे आपल्या बरोबरीचे सर्व सहकारी शहीद झाले आणि आपण वाचलो ही ईश्वराची काही तरी इच्छा असावी. हे विचार निर्माण झाले. त्यामुळे संपूर्ण जीवनाचे ध्येय ठरवले. जीवनात फक्त सेवा (निष्काम कर्म) करण्याचे व्रत घेतले. स्वामी विवेकानंद म्हणतात प्रत्येक माणूस आपल्या जीवनात काही ना काही दैनंदिन ध्येय ठरवत असतो. पण एक ध्येय पूर्ण झाले की दुसरे ध्येय ठरवतो. दुसरे ध्येय झाले की तिसरे दैनंदिन जीवनाचे ध्येय ठरवत असतो. दैनंदिन जीवनाचे ध्येय जीवनात कधीच संपत नाहीत. सारखे ते ध्येय बदलत असतात. त्यामुळे आपणाला आयुष्यात नक्की कुठे जायचे आहे ती मंजील दिसत नाही. इतरांकडे पाहून ते ठरवत असतात म्हणून त्या ध्येयामध्ये फक्त मी माझे याचाच विचार असतो. फार तर आमचा विचार असतो. गाव, समाज, देशाचा विचार नसतो.
५
म्हणून दैनंदिन ध्येयाची वाटचाल करताना अडचणी आल्या, विरोध झाला, निंदा झाली की त्याच्या मनाला थकवा येतो आणि त्याचे ध्येय बदलत जाते. कधी कधी तर हाती घेतलेले कार्य सोडून देतो आणि तो थांबतो. कारण ते दैनंदिन ध्येय आहे. माणसाने माझ्या संपूर्ण आयुष्याचे ध्येय काय आहे? हे त्याने ठरवणे आवश्यक आहे. कारण माणसे जन्माला येतात रिकाम्या हाताने व जातातही रिकाम्या हाताने. मात्र आयुष्यभर माझं माझं करीत पळताना थांबत नाहीत. मग तो जगतो कशासाठी? याचा विचार करणे आवश्यक आहे. म्हणून कार्यकर्त्याने संपूर्ण जीवनाचे ध्येय निश्चित केले कि माणसाने आपल्या मरणाला जिंकलेले असते. असा मरणाला जिंकणारा माणूस संकटांना, विरोधाला अपमानाला घाबरत नाही. मरण आले तरी चालेल आता माघार नाही, अशा विचाराने तो संकटावर मात करीत चालत राहतो. म्हणून संपूर्ण जीवनाचे ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. हे विवेकानंदाचे विचार मनाला भावले.
महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंदांच्या विचाराप्रमाणे मी वयाच्या 25 व्या वर्षी जीवनाचे ध्येय निश्चित केले. जीवनात फक्त निष्काम भावनेने सेवा करीत राहणे हे ध्येय ठरविले. आपल्या गावची सेवा, समाजाची सेवा, आपल्या देशाची सेवा करण्याचे ध्येय निश्चित झाले. गेली 50 वर्षे त्या ध्येयाची वाटचाल करीत असताना विरोध झाला, निंदा झाली, अपमान झाला पण जीवनाचे ध्येय निश्चित झाल्यामुळे थांबलो नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात संपूर्ण जीवनाचे ध्येय ठरवल्यानंतर जीवनात कुठे जायचे ती मंजील दिसेल. मजीलकडे जाताना विरोध होईल, निंदा होईल अपमान होईल, मानसिक आणि शारीरिक त्रासही होईल, पण मधेच थांबू नका, चालत रहा. तिथपर्यंत चालत रहा की मरण आले तरी चालेल. त्या मंजीलकडे जाताना जेव्हा माणूस जीवनाचे ध्येय निश्चित करून वाटचाल करीत असतो तेव्हा त्याला आयुष्यात कुठे जायचे आहे ही मंजील दिसायला लागते.
मी जेव्हा गाव, समाज, देशाची सेवा करण्याचे ध्येय ठरवले तेव्हा माझ्या समोर मला सेवा ही मंजील दिसली होती. कारण गावची आर्थिक परिस्थिती बिकट होती. मला मिळणारी पेन्शन फक्त पंधरा हजार रूपये होती, याशिवाय कोणतीही आर्थिक आवक नाही. सेवा करीत त्या मंजीलकडे वाटचाल करताना खूप अडचणी आल्या. कधी कधी जनतेच्या, गावाच्या कामासाठी मुंबईसारख्या ठिकाणी लॉजमध्ये राहण्यासाठी पैसे नाही म्हणून मुंबई सेंट्रल बसच्या स्टँडवर वर्तमान पत्रावर झोपलो. असेच एकदा मी गावातील गरीब परिवारांना गाई घेण्यासाठी दोंडाईचाला गेलो होतो. रात्री दीड वाजता बसने मुंबईत आलो आणि वर्तमानपत्रावर झोपलो. रात्री कोणीतरी चप्पल चोरून नेली. सकाळी बिना चप्पल अनवाणी जाऊन दुकाने उघडल्यानंतर सहा रुपयांची हवाई चप्पल घेतली आणि मंत्रालयात गेलो. जनहिताच्या कामासाठी अनेक वेळेला मुंबईला जावे लागत असे काही वेळेला चौपाटीच्या समुद्रावर स्नान करून कपडे बदलून
0 Comments