Ticker

6/recent/ticker-posts

श्रीसंत वासुदेव महाराज यांच्या पालखीचा पोखरणी भक्तिमय स्वागत.

      
 अकोला..,....,............,....,.... श्रीसंत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोट जिल्हा अकोला.. गुरुवर्य वासुदेव महाराज श्रद्धा सागर आकोट येथून निघालेला पैदलरवारी पालखीचा प्रवास   परभणी वरून पोखरणी पर्यंत पूर्ण झाला असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले  .
असून आज संध्याकाळी     नरसिंह मंदिर पोखरणी या मुक्कामाच्या ठिकाणी हरिपाठ ,कीर्तनाचा कार्यक्रम ह-भ-प वासुदेव पाटील महल्ले यांचे या ठिकाणी संपन्न झाले त्यानंतर एकादस असल्यामुळे सर्वांना फराळाचे वाटप कार्यक्रम पार पडला व त्या कार्यक्रमाचे आयोजन  हरिभाऊ धोंडरकर यांनी केले होते. सकाळी चहापान आटपून पालखी  गंगाखेड कडे रवाना झाली अनेक गावागावात चौका चौकात स्वागत स्वीकारि माऊलीची पालखी निघाली गंगाखेड कडे  रवाना झाली .      शहरातील अनेक ठिकाणी पालखीचे भव्यदिव्य स्वागत केले . दुपारचे फरा परभणी येथील महाराजांचे फक्त राजेश भांगे यांच्याकडे झाले व त्या ठिकाणी  प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला.
 रस्त्याने गावातील नागरिकांनी भव्यदिव्य भक्तिमय स्वागत केले . . या ठिकाणी प्रवचन झाल्यावर दिंडी पुढील मार्ग  कडे प्रस्थान केले . पालखीचे सकाळी     परभणी शहरात चौकाचौकात स्वागत व फराळाचे चहा पानाचे वाटप करण्यात आली. त्यानंतर पालखी चे प्रस्थान झाले. जय हरी माऊली, जय जय राम कृष्ण हरी , वासुदेव महाराज की जय ,भास्कर महाराज की जय असे तुकाराम महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली की जय चे नारे लावत पालखी   अनेक चौकाचौकात स्वागत शिकारीत मधेच चहापान फराळ तसेच  अनेक अभंगाचा गजर करत आली त्यानंतर अनेक ठिकाणी   भव्यदिव्य स्वागत करण्यात आले तसेच वारीमध्ये सहभागी भक्तांनी या ठिकाणी पावली, फुगडी ,रिंगण भारुड आधी करुन गावकऱ्यांचे मन जिंकली त्यानंतर  गंगाखेड कडे पुढील प्रवासाला प्रस्थान केले अशी माहिती वारीमध्ये सहभागी असलेले वारकरी समाजसेवक गजानन हरणे यांनी दिली  

Post a Comment

0 Comments