• वाशिम जिल्हा पोलीस दल महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी सतत उपक्रमशील असून सातत्याने नवनवीन संकल्पना राबवीत प्रशासनास अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी प्रयत्नशील असते. याच पाश्र्वभूमीवर दि. २४.०६.२०२२ रोजी पो.स्टे. वाशिम ग्रामीण येथे बालस्नेही पोलीस स्टेशन'चे उद्घाटन करण्यात आले. बालन्याय काळजी व संरक्षण अधिनियम, २०१५ अंतर्गत काळजी तसेच संरक्षणाची गरज असणारे त्याचबरोबर
विधीसंघर्षग्रस्त बालकांना योग्य काळजी-संरक्षण-विकास-उपचार पुनर्वसन अशा सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बालस्नेही दृष्टीकोन समोर ठेवून पो.स्टे. वाशिम ग्रामीण येथे 'बालस्नेही पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात •आली आहे. लहान बालकांचा गुन्हेगारी क्षेत्रातील सहभाग वाढत असून सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात सन २०२०-२२ मध्ये विधीसंघर्षग्रस्त १८ बालकामगार ११. बालविवाह ०२, पॉस्को सह (३७६ भादंवि ५९), (३५४ भादंवि १००) ((३६३ भादंवि ०९) बालकांची हि आकडेवारी काळजी करण्यासारखी बाब आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न म्हणून कोणत्याही कारणाने पोलीस स्टेशनला आलेल्या बालकाला त्याच्या मनोरंजनासाठी साहित्य, खेळणी विविध माहिती पत्रके लावून प्रसन्न • आनंदी व हसतखेळत बातावरण निर्मिती केल्यास बालकांना स्वच्छंदी व निर्भीड वातावरणात आपले म्हणणे सुव्यवस्थित मांडता येईल व बालकांमध्ये पोलिसांप्रती आपलेपणाची व विश्वासाची भावना निर्माण होऊन त्यांचे मतपरिवर्तन करणे शक्य होईल. यापूर्वी सुद्धा मा.पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्या संकल्पनेतून ते पुणे येथे पोलीस उपआयुक्त (गुन्हे) यापदी कार्यरत असतांना महाराष्ट्रात सर्वप्रथम त्यांनी पो.स्टे. लष्कर, जि.पुणे येथे फेब्रुवारी २०२० मध्ये बालस्नेही पोलीस स्टेशन' या अभिनव संकल्पनेची सुरुवात केली होती. यामध्ये पुणे येथील 'होप फॉर चिल्ड्रेन' हि समाजसेवी संस्था उत्कृष्टरीत्या कार्य करत असून बालकांच्या प्रश्नांवर तत्परतेने उत्तरे शोधण्याचा त्यांचा ध्यास वाखाणण्याजोगा आहे.
दि. २४.०६.२०२२ रोजी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये पुणे येथील 'होप फॉर चिल्ड्रेन संस्थेच्या श्रीमती रुपा कपूर, श्री. शकील शेख व श्री. वसीम शेख यांनी बाल न्याय कायदा, २०१५ व पॉस्को कायद्यासंदर्भात उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केले. त्याचबरोबर पोलिसांनी संवेदनशील राहत लहान मुलांसमवेत खेळीमेळीचे वातावरण तयार करून त्यांना आपलेसे • करण्यासंदर्भात प्रोत्साहित केले. राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन हे 'बालस्नेही पोलीस स्टेशन बनावे यादिशेने त्यांचा प्रवास सुरु असून त्यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर आवश्यक ती सर्व मदत पुरविण्याचे वचन त्यांनी दिले. सदर प्रशिक्षणासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमधील विशेष बाल संरक्षक पथकातील अधिकारी अंमलदारांनी भाग घेतला व सदर उपक्रमाची स्तुती केली. त्याच धर्तीवर पो.स्टे. वाशिम ग्रामीण येथे परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी (IPS) यांच्या नेतृत्वाखाली 'बालस्नेही पोलीस स्टेशन'ची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन मा. पोलीस • अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्याहस्ते दि. २४.०६.२०२२ रोजी झाले.
प्रत्येक बालकाला काळजी व सुरक्षेची गरज असते. 'बालस्नेही पोलीस स्टेशन हे फक्त विधीसंघर्षग्रस्त बालकांसाठीच नसून सर्व बालकांसाठी आहे. त्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे अधिकारी व अंमलदार यांच्या बालकांचाही समावेश होतो. पो.स्टे. वाशिम ग्रामीण येथील ११ महिला अंमलदारांचे मुलेसुद्धा बालस्नेही कक्षा'स भेट देतात. तेथे मनसोक्त खेळतात. बागडतात, अभ्यास करतात त्यांना हि संकल्पना खूप आवडली असल्याचे ते सांगतात. अशाप्रकारच्या उपक्रमांमुळे विधीसंघर्षगस्त बालके नशेपासून, गुन्हेगारीपासून दूर होऊन चांगल्या वळणाला लागतील व समाजाच्या प्रगतीसाठी बहुमुल्य योगदान देतील. सदर उपक्रमासाठी पो.स्टे. वाशिम ग्रामीणचे पोना संदीप गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांना जयश्री मजलकर, रजनी सरकटे व सपोउपनि विजय नरडे यांच्यासह इतरांनी सहकार्य कले.
0 Comments