Ticker

6/recent/ticker-posts

प्री- वेडिंग शूटिंग च्या नावावर लग्नविधी चे लक्तरे तोडणाऱ्यांनो आता तरी सावध व्हा

      विनाकारण खर्च करू नका

आजकाल लग्न समारंभ म्हटले म्हणजे प्री- वेडिंग शूटिंग आलंच,प्रि-वेडिंग हे प्रत्येक समाजाच्या  विवाह संस्कृतीला लागलेलं ग्रहनच म्हणता येईल. एखादया बॉलिवूडच्या रोमँटिक चित्रपटातील अभिनेता, अभिनेत्रीला ही लाजवेल अश्या अभिनयाचे प्रि-वेडिंग  व्हिडीओ बघितले की वाटत आहे.

पूर्वी विवाह सोहळा आटोपल्यावर देखील आठ - पंधरा दिवस नवरदेव नवरी एकमेकांशी साध बोलत ही नव्हते इतकी जवळीक तर दूरच,

आपण ज्या समाजात जन्मलो अशा प्रत्येक समाजात वेगवेगळ्या विवाह संस्कृती नुसार लग्न विधी झाल्यावर देवदेवतांचे पूजन व आशीर्वाद घेऊनच त्या त्या समाजाच्या रितीरिवाजानुसार नवं दांपत्य विवाह जिवनाची खरी सुरवात करत असत. परंतु आजकाल तर सोयरीक झाल्याबरोबरच लग्नाची खरेदी असो किंवा प्रि-वेडिंग शूटिंगच्या नावावर तर चार चार दिवस पर्यटन स्थळी नवरदेव नवरी फिरायला जात आहेत. लग्नानंतरचे सर्व संस्कार विधी  बहुदा लग्ना आधीच उरकल्या जातात की काय देव जाणे, असं प्रि- वेडिंगच्या व्हिडिओ वरून तरी वाटतं असून सर्रास प्रि -वेडिंग विषयी नकारार्थीच प्रतिक्रिया येत आहेत. लग्नविधीपूर्वी स्क्रीन वर दिसणारे प्री- वेडिंगचा परिणाम आजच्या किशोरवयीन मुलामुलींवर होत असून त्यांचे पळून जाऊन लग्न करण्याचे प्रमाण भविष्यात खूपच वाढत जाईल अशी चिंता व्यक्त केल्या जात असून दोष त्यांचा नसून ते अनुकरणशील असतात त्यांच वयच नासमज असत म्हणून आपणच सामाजिक भान ठेवणे गरजेचे आहे, लग्नातील प्री - वेडिंग प्रदर्शन हे खाजगी आयुष्य सार्वजनिक करणे नादान अल्पवयीन संस्कारक्षम मुलांसाठी खूपच घातक असून कुठेतरी हे थांबवायला हवं. लग्न सोहळ्याच्या विधीला वेळ असतो त्यावेळेस विवाहस्थळी मोठमोठ्या स्क्रीन वर हे प्रि-वेडिंगच्या नावावर नको नको ते प्रदर्शन नाईलाजाने का होईना वऱ्हाडी मंडळींना बघावच लागत आहे. त्यातील बहुतांश सेमी बोल्ड सीन बऱ्याचदा वयस्कर मंडळींना बघून न 
बघिल्यासारखं केल्या शिवाय पर्यायच उरत नाही. म्हणून भूतकाळातील गोड आठवणी, प्रेरणादायी क्षणचित्रे जरूर संग्रहीत ठेवा हवं तर दाखवा परंतु  नववधू वरांनी नात्यातील तारुण्याचा जिव्हाळा असलेलं आकर्षण लग्न होईपर्यंत तरी व्हर्जिनिटी सारख जपावं व प्रि-वेडिंगच्या नावावर  विवाह  संस्कृतीला  लागलेल्या ग्रहणापासून वाचवा व आपले खाजगी आयुष्य सार्वजनिक करणे टाळा, कारण हे करत असताना अनेक अशा गोष्टी कळत नकळत प्री- वेडिंग शूटिंग च्या नावावर राजरोसपणे फायदा घेणारे घेतात आपल्या घरात येणाऱ्या जिजाऊ चे सावित्री चे, रमाई चे बहिणीचे ,लक्ष्मी च्या, विचाराने येणाऱ्या नवरीचे. नवरदेवाचे  प्री- वेडिंग शूटिंग च्या नावावर प्रत्येक समाजाच्या  विवाह संस्कृतीला लागलेलं ग्रहनच थाबवा नाहीतर खूप मोठ्या समस्येला तोंड देता देता नाकी नऊ येतील कित्येक आई-वडील कर्जबाजारी होतील मुलगी पळून गेली म्हणून डिप्रेशनमध्ये जातील एवढेच नाही तर आत्महत्याही करतील ज्यांनी आपल्याला जग दाखवले त्यांच्यावर असे वाईट दिवस आणू नका हे कुठे तरी थांबवा. वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी

Post a Comment

0 Comments