Ticker

6/recent/ticker-posts

लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विविध विभागांचे कोरोना योद्धा सन्मानित

मुख्य वक्ते संजीव कसबे सहाय्यक महाव्यवस्थापक बीएसएनएल जालना
कोरोना योद्धा म्हणून सन्मानित मान्यवर
स्थानिक महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय पंचशील नगर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगरुळपीर येथील पंचायत समिती सभागृहात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. यावेळी कोरोना काळात ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाची सेवा केली ते आरोग्य  विभागातील अधिकारी व कर्मचारी परिचारीका यांना कोरोना योद्वा म्हणून सन्मानीत केले विविध शाळांमध्ये चांगले गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त महात्मा फुले सार्वजनिक वाचन कक्षाच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, यामध्ये न.प.चे सफाई कर्मचारी, आरोग्य वैद्यकीय कर्मचारी, परिचारिका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील, कोतवाल यांच्यासह अनेकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. विविध शाळांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे विद्यार्थी दहावी मध्ये शाळेतून पहीले आलेले  अरिषा सुजात मिर्झा अनवर अमान उर्दू स्कूल,
 तुषार रंजन चव्हाण जिल्हा परिषद हायस्कूल , गायत्री राजेश ओझा जिल्हा परिषद हायस्कूल, अनमोल प्रविण लोहीया नाथ विद्यालय , अर्पिता कांबळे यशवंतराव चव्हाण विद्यालय,  अनमोल प्रवीण लोहिया नाथ विद्यालय, अर्पिता मनोज कांबळे यशवंत चव्हाण  विद्यालय , ऋषिकेश  
संजय म्हात्रे प्र.ग गावडे विद्यालय ,अंश सुरेश नाकाडे यशवंतराव चव्हाण विद्यालय, बारावी मधून कॉलेज मधून प्रथम आलेला विद्यार्थी मोहम्मद साद अब्दुल्ला शेख . जिल्हा परिषद हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज , भाविका पुंडलीक राऊत , साळूंकाबाई राऊत कला व वाणीज्य महाविद्यालय, प्रतिक डिंगाबर काळे वसंतराव नाईक महाविद्यालय , सायली प्रकाश भगत वसंतराव नाईक महाविद्यालय , स्नेहल येखंडे यशवंतराव चव्हाण महाविघालय, हर्षदा राठोड यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय  या सोबतच डायल 112 वर संपूर्ण महाराष्ट्रात वाशिम जिल्ह्यात ग्रामीण विभागात मंगरूळपीरचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल मंगरूळपीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील हुड यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी युनीयनचे तालुकाध्यक्ष अरुण भगवान राऊत , महावितरणचे संतोष मुंदे , सौ सुमीत्रा सुर्यभान सोळंके ग्रामीण रुग्णालय , नगर परिषद कर्मचारी  राजेश संगत पोलीस पाटील सुनिल ठाकरे पाटील , शहर अंगणवाडी सेविका सुजाता तुपोने , कोतवाल बबन गायकवाड , सामाजीक कार्यकर्ता महानंदा अगुलदरे या सर्वांचे शाल , बुके , सन्मानचिन्ह देऊन मंगरुळपीरचे उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, प्रमुख वक्ते संजीव कसबे,  आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद भगत, बालविकास प्रकल्प अधिकारी नितीन श्रीकृष्ण लुंगे, महावितरणचे उपविभागीय कार्यकारी अभियंता डॉ. हीरालाल जांभुंलकर प्राचार्य दिलीप आंबेकर जिल्हा परिषद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या हस्ते शाल व मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले

 इतिहासाचे गाढे अभ्यासक कर्तव्यदक्ष मंगरूपीर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी आपल्या विचारातून सांगितले की, राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली.आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार केला व त्यासंबंधी कायदा आणला,आपल्या कृतीतूनच संदेश जावा यासाठी आपल्या चुलतबहिणीचा विवाह त्यांनी आंतरजातीय केला,अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. मुळे यांनी महाराजांचा इतिहास डोळ्यापुढे मांडला.

. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संजीव कसबे (सहाय्यक महाव्यवस्थापक बीएसएनएल जालना) यांनी भारतीय संविधान, सन्मान, सुरक्षा आणि संवर्धन या विषयावर भाषण केले. यादरम्यान काही कोरोना योद्ध्यांनी त्यांचे अनुभवही सांगितले. कार्यक्रमाचे उत्तम संचालन विनोद डेरे अध्यक्ष महात्मा ज्योतीबा फुले सार्वजनीक वाचनालय पंचशिल नगर मुर्तिजापूर ता मंगरुळपीर  यांनी केले तर आभार  गजनफर हुसेन यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वी करण्यात मुदस्सीर सौदागर, वसीम इंजिनियर, समाजसेविका सौ अश्वीनी औताडे , नितीन गावडे , पंजाब अघम, राहुल इंगोले यांनी परिश्रम घेतले व इतर प्रायोजकांची भूमिका वाखाणण्याजोगी होती.

Post a Comment

0 Comments