वाशिम - कोविड काळापासून मंगरुळनाथ ते पिंजर ही बंद पडलेली बससेवा त्वरीत सुरु करुन विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांनी मनसे जिल्हाध्यक्ष राजु किडसे यांच्या मार्गदर्शनात २४ जुन रोजी मंगरुळनाथ आगार प्रमुखांना निवेदन दिले.
निवेदनात नमूद आहे की, कोविड काळात बंद पडलेली बससेवा आता पुर्ववत सुरु झाली आहे. तसेच जिल्हयातील अनेक भागात एस.टी. बससेवा सुरु करण्यात आल्या आहे. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला असून खाजगी वाहनधारकांची लुट थांबली आहे. असे असले तरी मंगरुळनाथ ते पिंजर बससेवा अद्यापही सुरु नसल्यामुळे प्रवाशांचे मोठे हात होत आहेत. पिंजर येथील अनेक लोकांना मंगरुळनाथ बाजारपेठेसाठी जावे लागते. अशातच या मार्गावरुन बससेवा बंद असल्यामुळे त्यांना खाजगी वाहनाने जावे लागते. या परिस्थितीचा लाभ घेवून खाजगी वाहनचालक प्रवाशांची लुट करत आहेत. तसेच मर्यादेपेक्षा जास्त लोक खाजगी वाहनांमध्ये नेत असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच बससेवा बंद असल्यामुळे एसटीचा मोठा महसुल बुडत आहे. ही बाब लक्षात घेवुन मंगरुळनाथ ते पिंजर बससेवा त्वरीत सुरु
0 Comments