Ticker

6/recent/ticker-posts

निराधार योजना उत्पन्न दाखला मुदत वाढवून द्या

संजू आधार वाडे यांची मागणीमंगरुळपिर तालुक्यातील श्रावण बाळ योजना व संजय निराधार गांधी योजना साठी तहसील कार्यालयाने दि 30 जून पर्यंत उत्पन्न दाखले मागविले आहे मात्र अनेक तांत्रिक अडचणी असल्यामुळे दि 30 जुलै पर्यंत मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी कार्याध्यक्ष नगरसेवक परिषद महाराष्ट्र राज्य संजू वाडे यांनी नायब तहसीलदार यांचेकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे 
सदर निवेदनाचा आशय असा की,
तहसील कार्यालय मंगरूलपीर
 माध्यमातून श्रावण बाळ योजना. संजय गांधी निराधार योजना. यासाठी लाभार्थींना दिलेली उत्पन्न दाखला तसेच इतर कागदपत्रे यासाठी दिलेली दिनांक 30 जून ही अंतिम तारीख दिली आहे परंतु विविध अडचणीमुळे आमचा बयाच वृद्ध लाभार्थींना कागदपत्रे देण्यासाठी शक्य होत नाही


 तलाठी साहेब यांच्यामागे असलेल्या कामाचा व्याप सर्वर मुळे वारंवार काम बंद पडत आहे तसेच या दरम्यान पेरणे पाण्याचे दिवस असल्यामुळे येणे शक्य होत नाही त्यातच दाखल्यांची संख्या जास्त असल्यामुळे एकाच वेळेस शेकडो दाखले सही अभावी थांबलेले आहेत तसेच लाभार्थी हजारो संख्येने असून त्याचे हजारो लोकांचे उत्पन्न दाखला देणे बाकी आहे तरी विनंती की 30 दिवसाचा कालावधी कागदपत्र जमा करण्यासाठी वाढवून देण्याबाबत आम्ही निराधार शेकडो लोक आपणास विनंती करत आहे असे निवेदनात नमूद आहे या निवेदनावर संजय वाडे,माजी प स सदस्य युनूस खान,शेख नवेद यासह शेकडो लाभार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत


Post a Comment

0 Comments