Ticker

6/recent/ticker-posts

लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय - खंडाळा येथील 10 वी च्या मुलांचा गुणगौरव...


लोणावळा. पत्रकार श्रावणी कामत 
लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय खंडाळा येथील ईयत्ता दहावीचा निकाल १००% लागला असुन त्यानिमित्ताने माजी विद्यार्थी संघ - खंडाळा व इंडियन स्काऊॅट अँड गाईड फेलोशिप लोणावळा गिल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वी विद्यार्थी गुणगौरव समारंभ ( पेढा भरऊन व भेटवस्तु देऊन) काल विद्यालयात पार पडला.       
                              सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन श्री दिवेकर सर ( मुख्याध्यापक - विद्यालय ) व प्रमुख पाहुणे म्हणून सौ.श्रावणी कामत ( प्रसारक - इंडियन स्काऊॅटअँड गाईड फेलोशिप लोणावळा गिल्ड ) लाभले. श्री सरस्वती प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मंगेश खराडे यांनी केले.दोन्ही मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थी मित्रांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
सदर कार्यक्रमास माजी विद्यार्थी संघ संस्थापक अध्यक्ष श्री मंगेश खराडे, विद्यमान अध्यक्ष श्री सुरेश गायकवाड, प्रकाश जैन, अशोक गवारणे, राजेश महाडिक, मंगेश येवले, सौ.छाया सपकाळ ( बनसोडे) व सौ.संगिता बचाटे ( शेख ) तसेच शिक्षक वृंद सौ.संजना भाले मॅडम, श्री बोरसे सर, श्री सुर्यवंशी सर हे मान्यंवर उपस्थित होते.                         श्री बोरसे सर यांनी उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांचे आभार माणुन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments