Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपिर येथील न प शाळा क्र 2 व शहर चे उदू शाळा मध्ये सुविधाचा अभाव


शेख इरफान यांचे जिल्हा अधिकारी यांना निवेदन
मंगरूळपिर येथील नगर परिषद शाळा क्र 2 येथे गेली अनेक वर्षांपासून सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना विविध समस्याला सामोरे जावे लागत आहे या समस्याचे तात्काळ निवारण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान यांनी दि 28 रोजी न प मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केले आहे 

  सदर  निवेदनाचा आशय असा की,नगर परिषद शिक्षण विभागाच्या समस्या सोडवुन नागरिकांना चांगल्या प्रतीच्या शैक्षणिक सुविधा पुरविणे
 नगर परिषद शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळा जिल्ह्यातच नव्हे तर विभाग आणि राज्य स्तरावर चांगले, दर्जेदार शिक्षण पुरविण्यासाठी प्रसिद्ध आहे.मराठी शाळा क्रं. २ घ्या विद्यार्थ्यांच्या विविध परिक्षेतील यशामुळे मंगरुळपीरचे नावलौकिक जिल्ह्यात वाढत आहे.
नगर परिषद मंगरुळपीर अंतर्गत शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे अतिशय गरीब, बहुजन,दलीत, अल्पसंख्याक आणि मजुरी करुन हातावर पोट असणाऱ्या लोकांचे मुले आहेत.नगर परिषद शाळांमध्ये चांगले शिक्षण जर त्यांना मिळाले तर अशा वंचीत लोकांचे कुटुंबाचे शैक्षणिक भवितव्य उज्वल होऊ शकते   मात्र नगर परिषद मंगरुळपीर शिक्षण सुविधा साठी अतिशय उदासीन असल्याचे दिसते. 
आधीच कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना दोन वर्षे शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे.यावर्षी शाळा सुरु झाल्या पण नगर परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता ही अतिशय गंभीर समस्या आहे.विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थांचे अतोनात हाल होत आहे.विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक मिळावे.मराठी माध्यमात जवळपास १२पदे रिक्त असल्याचे समजते.तसेच उर्दू माध्यमाच्या शाळेत पण शिक्षक पदे रिक्त आहेत.
शासनाकडून शिक्षकांची नेमणूक होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने ईतर नगर पालिकेमध्ये ज्याप्रमाणे शिक्षक नेमले आहेत त्याप्रमाणे नेमणूक करून गोरगरीब जनतेला शिक्षणासारखी मुलभूत सुविधा पुरविण्याचे काम नगर परिषद मंगरुळपीर ने तात्काळ करावे 
तसेच अन्य नगर परिषद मध्ये तसेच जिल्हापरिषद मध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेक्सबेंच आहेत मात्र आपल्या नगर परिषद मंगरुळपीर अंतर्गत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी साधे तरळपाट सुद्धा नगर परिषद पुरवत नाही, त्यामुळे नगर परिषद सामान्य जनतेकडून शिक्षणकरापोटी वसुल करणार्या रकमेचे काय विनीयोग करते याबाबत सामान्य जनतेला संभ्रम आहे. गोरगरीबांच्या लेकरांना शिक्षणाची पायाभूत सुविधा पुरविण्यास जर नगर परिषद असमर्थ असेल तर शेवटी सुजान नागरिक म्हणून आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल. 
शिवाय काही वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी गळत असते,स्लॅप मोडकळीस आलेले आहे.भविष्यात स्लॅप कोसळल्यास विद्यार्थी व शिक्षकांना प्राणाला मुकण्याची पाळी येऊ शकते तरी तात्काळ उपाययोजना करुन विद्यार्थ्यांना राज्यघटनेने प्रदान केलेले शिक्षणाचे मुलभुत अधिकार चांगल्या पद्धतीने पुरविण्याची जबाबदारी ही नगर परिषदची आहे. 
वरील शैक्षणिक समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात अन्यथा शाळाबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातुन दिला आहे या निवेदनावर  इरफान शेख
   गौरव कुमार इंगळे  नावेद शेख
          शुभम ठाकूर इमरान शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

Post a Comment

0 Comments