प्रतिनिधी।कारंजा
अरकान ए हज अदा करण्यासाठी मक्का मदीना जाणाऱ्या हाजी मध्ये मो बिलाल सेठ पुंजानी व परिवारचे सदस्य तसेच मो आफ़ताफ मरछिया सह परिवार चे सदस्य आदि गुरुवारला कारंजा येथून मक्का मदीनासाठी रवाना झाले. हज अदा करण्यासाठी मक्का मदीना जाणाऱ्या हाजिनी गुरुवारला नमाज ए असर स्थानीय नगीना मस्जिद मध्ये अदा केली यावेळी उपस्थित नागरिकांनी सर्व हाजी यांची भेट घेऊन दुआ करण्याचे सांगितले,नमाज ए असर नंतर सर्व हाजी मूर्तिजापुर रेलवे स्टेशन वरून अमरावती मुंबई एक्सप्रेस ने मुंबई करीता रवाना होतील.।सर्व हाजी ३ जुलै रोजी अल इरफान टूर्स ने जद्दासाठी रवाना होणार आहे.उपस्थित नागरिकांनी पुष्यमाला घालून त्यांना मक्का मदीना हज साठी रवाना केले.यावेळी हाजी मो युसुफसेठ पुंजानी सह अन्य मान्यवरांनी हज अदा करण्यासाठी जाणाऱ्या हाजींना मक्का मदीना शरीफ यथे आपल्या व देशाच्या उन्नती साठी, एकता,अखंडता,बंधुत्व,शांती व सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी दुआ करण्याचे सांगितले तसेच हज यात्रे साठी जाणाऱ्या हाजींना सुद्धा उपस्थितांना दुआ करण्याचे सांगितले.याप्रसंगी बहुसंख्य मान्यवरांनी पुष्यमाला घालून हाजींना हज यात्रे साठी रवाना केले.
0 Comments