या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी सखारामजी मुळे ,उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंतरावजी केडगे, ठाणेदार सुनील हूड, गटशिक्षणाधिकारी सुभाष पवणे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी विजय राठोड ,जिल्हा परिषद सदस्य आर के राठोड, पंचायत समितीचे उपसभापती रमेश राठोड, शंकरदादा तायडे, समाधान भगत व इरफान शेख , यांची उपस्थिती लाभली, मान्यवरांच्या हस्ते हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वृक्षारोपण करण्यात आले आणि काही शिक्षकांचा सन्मान सुद्धा करण्यात आला याप्रसंगी
मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी सखारामजी मुळे यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनावर प्रकाश टाकला
वसंतराव नाईक यांचा जन्म बंजारा समाजामध्ये सौ. होनुबाई फुलसिंग नाईक यांच्या पोटी दि. १ जुलै १९१३ रोजी गहुली (ता. पुसद, जि. यवतमाळ) या गावी झाला. वसंतराव नाईक यांचे आजोबा चतुरसिंग (राठोड) नाईक यांनी गहुली हे गाव वसविले. चतुरसिंग हे तांड्याचे प्रमुख होते. म्हणून त्यांना लोक नाईक म्हणत. वसंतरावाचे बालपण गहुली गावीच गेले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण पोहरादवी, उमरी, भोजला, बान्सी या ठिकाणी झाले. त्या काळी वाहूनांची सोय नसल्यामुळे ते चार-पाच मैल चालत जाऊन मोठ्या जिद्दीने व कष्टाने शिक्षण घेतले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण अमरावती व नागपूर येथे पूर्ण केले. वाचनाची उदंड आवड निर्माण झाल्यामुळे महात्मा फुले व अन्य समाजसुधारकांचे त्यांनी वाचन केले.
सन १९३३ साली नागपूर येथील नील सिटी हायस्कूलमधू मॅट्रिक परीक्षा वसंतराव नाईक उत्तीण केली. नागपूर विद्यापिठातून सन १९३७ साली बी.ए. ची पदवी घेतली. पुढे १९४० साली नागपूर विद्यापीठ विधी महाविद्यालयात एल. एल. बी शिक्षण घेऊन कायद्याची पदवी मिळवली. वकीली व्यवसायात त्यानी दिन-दुबळ्या, गोर-गरिबांना मदतीचा हात देऊन विविध अडचणीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. यात त्यांना मोठे यश आले. अशा अनेक गोष्टींच्या सखोल माहितीचा पाळा वाचून दाखवला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास राठोड, देवीसिंग राठोड, पी.एम.चव्हाण, धीरज चव्हाण ,ज्ञानेश्वर राठोड, मांगूसिंग चव्हाण, मेजर नामदेव चव्हाण, के. एन. राठोड, दशरथ राठोड, शिवचंद चव्हाण, जी.के राठोड, , रोशन चव्हाण, ऋषभ चव्हाण, सुमित चव्हाण ,जय राठोड, कार्यक्रम उपस्थित होते वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमात अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते





0 Comments