कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज १ जुलै रोजी श्री धानोरकर आदर्श विद्यालय धानोरा खुर्द येथे
कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री
वसंतरावजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ जिरवणकर
मॅडम यांनी स्वीकारले तर प्रमुख अतिथींचे स्थान सौ अंजली धानोरकर मॅडम यांनी स्वीकारले कार्यक्रमाची सुरुवात वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार व पुष्प अर्पण करून करण्यात आली विद्यालयातील 5 ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी वसंतरावजी नाईक यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख अतिथी धानोरकर मॅडम यांनी वसंतरावजी नाईक यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांनी वसंतरावजी नाईक यांच्या राजकीय प्रवासाची माहिती दिली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ जिरवणकर मॅडम यांनी महाराष्ट्र मध्ये राबवलेल्या योजना रोजगार हमी योजना धवल क्रांती पंचायत राज तसेच शेतकऱ्यांसाठी दुष्काळी परिस्थितीमध्ये केलेली मदत या बाबी करिता त्यांचा हा जन्मदिवस सर्व जनतेला माहिती असावी म्हणून त्यांचा हा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा करत आहोत अशी माहिती दिली कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व विद्यार्थी HBशिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी हजर होते कार्यक्रमाचे संचालन कुमारी अंकिता राठोड हिने तर आभार प्रदर्शन कुमारी खुशबू चव्हाण हिने मानले
0 Comments