Ticker

6/recent/ticker-posts

अभ्यासा इंग्लिश स्कूलमध्ये वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मंगरूळपीर :  वरुड रोड  अभ्यासा इंग्लिश स्कूल येथे हरित क्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष आत्माराम चव्हाण मुख्याध्यापिका रेश्मा चव्हाण यांनी पूजन करून हार व पुष्प अर्पण केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा चव्हाण यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनपटावर विचार व्यक्त करताना कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज १ जुलै रोजी  कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले
वसंतराव फुलसिंग नाईक हे कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीतज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ होते. नाईकांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील गहुली या छोट्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. हे पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद होते. नाईक हे महाराष्ट्रातील हरित क्रांती, पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक समजले जातात. माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी "वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत." या शब्दात नाईकांचा गौरव केला. इ.स. १९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना मदतीच्या योजना राबवल्या. नाईक यांना 'शेतकऱ्यांचा जाणता राजा', 'हरितयोद्धा' म्हणूनही संबोधतात.साहित्यिक, विचारवंत एकनाथ पवार यांनी 'आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत' या शब्दात वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे. त्यांच्याप्रती विचार व्यक्त केले तेवढे थोडे आहे.
  अभ्यासा इंग्लिश स्कूल येथे 
 सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले. शाळेच्या शिक्षिका आरती राठोड, स्नेहा मिश्राम, रेणुका पवार, पलवी गोरटे, काजल कंटाळे, स्नेहा काबरा, दर्शना दिक्षित, कर्मचारी रवींद्र वानखडे, वर्षा सोनोने, वर्षा भगत , इत्यादींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती



Post a Comment

0 Comments