कारंजा (लाड) : हजारो वर्षाची धार्मिक परंपरा असलेल्या, श्रीक्षेत्र पंढरपुरच्या भव्य यात्रा सोहळ्याकरीता कित्येक वर्षांपासून कारंजा आगाराकडून जादा बसेस सोडण्यात येत असतात . यावेळी एस टी महामंडळाचे अधिकारी - कर्मचारी-कामगार-वाहक-चालक हे वारकर्यांची तन-मन-धनाने सेवा करून वारकऱ्यांमध्येच विठु रखमाईचे दर्शनाचा आनंद घेत असतात. मागील दोन वर्षात कोरोना महामारीच्या संकटामुळे, महाराष्ट्र शासनाने मंदिराना टाळे ठोकून यात्रा व प्रवासाला सक्त मनाई केलेली होती . त्यामुळे वारकऱ्यांना त्यांचे मायबाप आणि महाराष्ट्राचे आद्यदैवत पांडूरंगाला भेटता आले नव्हते. त्यामुळे लालपरी पासून मिळणाऱ्या करोडो रुपयांच्या उत्पन्नाला महामंडळ सुद्धा मुकले होते. परंतु यावर्षी लसिकरण १००% होऊन आपला महाराष्ट्र कोरोना मुक्त, मास्क मुक्त झाल्यामुळे शासनाने सर्व धार्मिक स्थळे, यात्रा उत्सव व प्रवासाला परवानगी दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सुद्धा यात्रा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे.त्यामुळेच आज दिनांक :०२ जुलै रोजी, "कारंजा ते पंढरपूर" करीता पहिली बस ( क्र MH 40 ; N4160 )सोडली आहे . सर्वप्रथम कारंजा आगाराने केळीचे खांब आणि फुलाच्या हाराने बस सुशोभित केलेली होती बसची विधीवत पूजा करीत श्रीफळ फोडून कारंजा आगाराचे वाहतूक अधिकारी डायलकर साहेब यांनी प्रवासी वारकऱ्यांचे सहर्ष स्वागत केले. व कारंजा आगारातर्फ मनोगत व्यक्त केले . त्याचप्रमाणे यावेळी पंढरपूरची वारी करून आजच कारंजा येथे पोहोचलेले जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करीत वारकऱ्यांना प्रबोधन केले. याप्रसंगी बसचे चालक अतुल भवाने ( 72124) तथा वाहक योगेश फाटकर (71335 ) यांचा सत्कार करण्यात आला. पहिली बस सोडल्यानंतर वारक च्यांचा उत्साह बघून लगेच बस क्र MH 20 ; AQ6344 ही बस सुद्धा पाठोपाठ सोडण्यात आली . या गाडीचे चालक डी डी पवार तथा एस जी तायडे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे मागणी झाल्यास आम्ही मागणी प्रमाणे जास्तितजास्त यात्रा गाड्या सोडून वारकऱ्यांची सेवा करणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले . याप्रसंगी महामंडळाचे आगारप्रमुख मुकूंद नावकर, मानके साहेब, संजय भिवकर, आय एस राठोड, रितेश बाबरे, दिपेश दिदावते, राजु रोडे, प्रवासी मंडळाचे संजय कडोळे, पत्रकार मोहम्मद मुन्निवाले, पत्रकार शिंदे ,विजय पाटील खंडार व बहुसंख्य वारकरी इत्यादी उपस्थित होते.विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या वारकऱ्यांमध्ये उत्साह व आनंद बघायला मिळत होता.हे उल्लेखनिय आनंदात मग्न दिसत होते.
0 Comments