Ticker

6/recent/ticker-posts

अमरनाथ यात्रा करुन आलेल्या भाविकांचे शेलुबाजार येथे जल्लोषात स्वागत..





शेलुबाजार परिसरातील राजमुद्रा ग्रुप च्या माध्यमातून अमरनाथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेची सुरुवात 17 जुलैपासून  झाली होती. 17 जुलै रोजी अमरनाथ यात्रेकरिता शेलुबाजार येथून 57 भाविक भक्त गेले होते. त्यांचे श्री सतीआई नगरीमध्ये 27 जुलै रोजी सुखरूपपणे यात्रा पार करून आगमन झाले. श्री अमरनाथ बाबा यांचे दर्शन घेऊन परत आलेल्या भाविक भक्तांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले अमरनाथ दर्शन घेऊन परत आलेल्या भाविकांचे शेलुबाजार येथील  श्री सतीआई नगरीमध्ये ढोल-ताशाच्या गजरात व फटाक्याच्या  अतिषबाजीमध्ये भाविकांच्या गळ्यामध्ये पुष्पहार घालून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. 17 जुलै रोजी गेलेले हे भाविक भक्त अमरनाथ यात्रा सुखरूप पणे पार करून  27 जुलै रोजी आपल्या गावी परतल्यानंतर ग्रामस्थानी गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढून यात्रेकरूचे  स्वागत केले. या यात्रेमध्ये  मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमि तसेच वृदावन येथील प्रेम मंदिर, बाके बिहारी मंदिर  पाहण्यात आले. पुढे आग्रा  येथील जगप्रसिध्द  ताजमहल पाहून पुढे अमरनाथ गुफे चे दर्शन घेण्याकरिता  बालटाल  मार्गे पायदळ वारी ला सुरुवात झाली व पुढे बाबा बर्फानी (अमरनाथ ) चे दर्शन घेऊन पुढे वैष्णवी देवीचे दर्शन घेण्यात आले. त्यानंतर अमृतसर येथील गोल्डन टेम्पल गुरुद्वारा पाहण्यात आला. त्यानंतर दिल्ली येथील लाल किल्ला, राष्ट्रपती भवन, अक्षरधाम मंदिर पाहून परतीचा प्रवास सुरु झाला या यात्रेचे विशेष म्हणजे राजमुद्रा ग्रुप मध्ये वयोवृद्ध 71 वर्षीय श्री ह.भ.प. विष्णुपंत राऊत महाराज यांनी संपूर्ण यात्रेत सहभाग घेऊन संपूर्ण यात्रा  पायदळ पूर्ण केली  या अमरनाथ यात्रेचे आयोजन शेलुबाजार येथील राजमुद्रा ग्रुप च्या माध्यमातून करण्यात आले होते अशी माहिती पवन राठी यांनी दिली.



Post a Comment

0 Comments