Ticker

6/recent/ticker-posts

अवैध तांदुळाचा ट्रक केला जप्त धडाकेबाज कारवाई,पुरवठा अधिकारी रुपाली सोंळके

मंगरुळपीर - मंगरुळपीर तालुक्यात अवैध धान्याचा गोरखधंदा प्रायव्हेट व्यापाऱ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कायम सुरुच असतो. आतापर्यंत शहरातील छोट्या-मोठ्या १२ कारवाई करण्यात आल्या 
 अवैध धंदे करणा-यांना घोडे लावण्याच धाडस  महसुल विभाग व  पोलीस विभागाने  सपाटा लावून धरला आहे. कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावला न जुमानता अवैध धान्यांचे अनेक ट्रक यापूर्वीही पकडले अशीच एक कारवाई काल दिनाक २७ जुलै रोजी सर्वात मोठी  धडाकेबाज कायवाही करत पुरवठा 
 अधिकारी रुपालीताई सोंळके यांनी ट्रक वाहन क्रमांक एम. एच. ४० बी. जी. ६२५६ या तांदुळ भरलेल्या संशयीत वाहनावर करुन मंगरुळपीर तालुक्यातील अवैध धान्य तस्करी करणा-यांचे धाबे दणाणून सोडले खरे मात्र त्यांनी केलेल्या कार्यवाहीत पुढे नक्की काय कार्यवाही होणार  ?  
नेहमी प्रमाणे वाहन मालक खोटे नाटे कागदपत्रे सादर करुन व राजकीय दबाव तंत्र वापरून नामानिराळा होणार काय याकडे मंगरुळपीर वाशी लक्ष ठेवून आहेत. पुरवठा अधिकारी रुपाली सोंळके यांनी संशयीत वाहन कृषी उत्पन्न बाजार समिती, मंगरुळपीर वजन काटा करुन निघून गेल्याचे माहिती अखिलेश महाकाळ रोजंदारी कमचारी यांनी दिली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून संबधीत वाहनाचा शोध घेतला असता मंगरुळपीर कारंजा रोडवर , चकवा फाटा, शेलुबाजार येथे सदर वाहन पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेतले . वाहन चालकाचे बयान घेतले असता वाहनातील तांदुळ अजीज खान छोटे खान यांचा आहे.
तांदुळ मानोरा रोड वरील गोदामातून भरलेला असुन कारंजा रोडवरील दुस-या गोदामात खाली करायचा होता अशी माहिती बयान देतेवेळी दिली सोबत धान्य काटा केल्याची पावती आहे याशिवाय इतर कोणतेच कागदपत्रे नसल्याचे बयाणात नमुद आहे. सदर वाहन संशयीत असल्याने वाहनाचा पंचनामा करुन धान्यासह वाहन पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे ठेवण्यात आले होते. एम. एच. ४० बी. जी. ६२५६ या तांदुळ भरलेल्या ट्रक मधून ४५७ कट्टे माल प्राप्त झाला आहे
  महाराष्ट्रातून व विदर्भातून सर्वात छोट्या मोठ्या कारवाया मंगरूळपीर च्या तहसीलच्या माध्यमातून करण्यात आल्या आहे. मंगरूळपीर चे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी सखारामजी मुळे, तसेच मंगरूळपीच्या तहसीलदार शितलताई बंडगर , अन्नपुरवठा विभागाच्या पुरवठाअधिकारी रुपालीताई सोंळके, अन्नपुरवठा निरीक्षक कु सीमाताई दोनदल ,
यांच्या माध्यमातून 
पुढील कार्यवाही सुरु असुन   या मोठ्या कायवाही मुळे पोलिसांच्या गळाला  मोठे मासे  लागतात का अशीही चर्चा जोर धरत आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे वाशिम जिल्ह्यातील धान्य तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Post a Comment

0 Comments