Ticker

6/recent/ticker-posts

एलपीजी पंचायत अंतर्गत सुरक्षा शिबीर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

मंगरुळपीर :- 
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे मंगरूळपीर येथील इंडियन गॅस चे संचालक पुरुषोत्तमभाऊ चितलांगे यांनी राबवलेल्या उपक्रमातून.
चितलांगे इंण्डेण गॅस मंगरुळपीर येथे
इंडीयन ऑईल कॉपोरेशन लिमिटेड    एलपीजी पंचायत अंतर्गत शहरातील जिल्हा परिषद हायस्कुल येथे सुरक्षा क्लिनिक,10 व 12 वीच्या 10 गुणवंत विद्यार्थ्यांचा मोमेंटो व बुके देऊन सत्कार व गरजुवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वृक्षारोपण तसेच 10 किलो कंपोझीट सिलेंडर चे वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगरुळपीर पोलिस उपविभागीय अधिकारी श्री यशवंत केडगे साहेब होते तर प्रमुख अतिथी म्हणुन प्राचार्य डिडि आंबेकर,पुरुषोत्तमजी चितलांगे ग्राहक पंचायतचे संघटण सरचिटणीस प्रा.सुधिर घोडचर,उद्योजक सतिष बाहेती, किशोर भुतडा हे मंचकावर उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष देऊन सोशलमिडीया मोबाईलचा  फक्त अभ्यासापुरता उपयोग करुन उतुंग शिखर गाठावे असे आव्हाण आपल्या भाषणात पोलिस  उपविभागीय अधिकारी केडगे साहेब यांनी केले.याप्रसंगी सर्व मान्यवरांचे शाल व श्रीफळ व बुके  देऊन चितलांगे इंण्डेण गॅसच्या वतीने जिल्हा परिषद शाळे च्या आवारात  सत्कार समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा  सुरक्षा विषयक संपुर्ण माहिती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुरुषोत्तमजी चितलांगे यांनी या एलपीजी पंचायतमध्ये योजनेअंतर्गत नवीन कनेक्शन कसे मिळते, सुरक्षीत पद्धतीने एलपीजी कसा वापरावा, याबाबत मार्गदर्शन करत पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा ही दिल्या
.याकार्यक्रमाचे संचालण डी.एस.दहात्रे सर तर आभार प्रदर्शन एस.एस.सोनोने सर यांनी केले या प्रसंगी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच चितलांगे इंण्डेचे गॅसचे कर्मचारी वृद व पत्रकार विनोद डेरे हे उपस्थित होते. अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी चितलांगे इंण्डेण गॅस तर्फे होत असते.

Post a Comment

0 Comments