रंगमंचावरील अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. प्राजक्ता ही ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचली. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक आदराचं स्थान निर्माण केलं आहे. सध्या प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते आणि कशा कुटुंबांना पोट धरून हसवणारी अभिनेत्री म्हटलं की प्राजक्ताचे नाव समोर येते. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्राजक्ताने खास पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या जीवनातील गुरुंना साष्टांग दंडवत केला आहे.
प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने काही फोटो शेअर केले आहेत. यातील पहिला फोटो हा प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्यासोबतचा आहे. तर दुसऱ्या फोटोत आध्यात्मिक गुरू ओशो आणि त्यापुढील फोटोत भगवान गौतम बुद्ध दिसत आहेत. या फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे.
प्राजक्ता माळीची इन्स्टाग्राम पोस्ट
“माझे ३ अध्यात्मिक गुरु…१. “श्री श्री” नीं मला “सुदर्शन क्रिया” आणि “ध्यान” करत जगण्याचे तंत्र शिकवले.२. ओशो- एक परम मंत्र. “ना भोगो ना त्यागो वरन जागो. !३- बुद्धा – जीवन तत्वज्ञान.मला वाटते, त्यांनी माझे मन आणि हृदय प्रशिक्षित केले आहे आणि मला माझ्या जीवनाचा उद्देश दिला.कधी कधी आपलं जीवनाचं तत्वज्ञान सांगायला भिती वाटते… ते जाहीर केल्यावर तंतोतंत पाळायची जबाबदारी येते. आणि कधी कधी ते बदलतं देखील पण माझा आत्ता ह्या क्षणी ह्यांच्यावर विश्वास आहे हे सांगायला हवं, अस मला वाटतं. आणि मी माणूस आहे. पुढे जाऊन मी चुकेन, हरवेन; पण एका माणसामुळे तुम्ही तुम्हांला पटलेल्या “ज्ञानावरचा” विश्वास गमावू नका. ज्ञानावर संशय घेऊ नका. असो , भारतीय गुरू परंपरेतील सर्व गुरूंना, आई- वडील, माझ्या नृत्य आणि योग गुरूंना, शालेय- कॅालेज शिक्षकांना तसेच माझ्या नकळत ज्यांनी ज्यांनी मला घडवलं त्यांना माझा हा साष्टांग दंडवत.” असे प्राजक्ता माळीने म्हटले आहे.
प्राजक्ता ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपासून ती रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत आली होती. यानंतर ती कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित वाय चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाची कथा अजित सुर्यकांत वाडीकर यांची आहे. तर या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ आणि संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत.
0 Comments