शेतात घुसले पुराचे पाणी शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान
मंगरूळपीर तालुक्यातील शिवनी अडान नदी परिसरातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमीन ही नदीच्या पुरामुळे पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून याकडे माननीय वाशिम जिल्हाधिकारी व महाराष्ट्र शासन तात्काळ पाहणी करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी यावर्षी पाऊस उशिरा झाल्यामुळे पेरणी सुद्धा उशिरा झाल्या जेमतेम कशाबशा संकटातून वाचल्यावर आज शेतात पाणी शिरल्यामुळे उद्या पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हालाखीच्या परिस्थितीत कशीबशी कुटुंबाची उपजीविकता भागून शेतकरी आपल्या शेतात कबाळ कष्ट करून मिळणाऱ्या उत्पादनावर आपल्या परिवाराची उपजीविकता भागवत असतो परंतु अशा पावसामुळे उभ्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे धाव घेतल्याचे दिसून येत आहे प्रशासन यांना न्याय देईल का नुकसान भरपाई देईल का. दि14/7/2022 रोजी जोरदार पावसाने सारखा तडाका लावून धरल्यामुळे नदीपात्रातील पाणी काही शेतकऱ्यांच्या शेताला घुसल्यामुळे तलावाचे स्वरूप शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जिल्हा प्रशासन यांच्याकडे अनिल गावंडे व इतर शेतकऱ्यांनी केली असल्याचे दिसून येत आहे.
शिवनी परिसरातील शेतकऱ्याच्या शेताला तलावाचे स्वरूप शेतकऱ्याचे नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाईची मागणी
0 Comments