Ticker

6/recent/ticker-posts

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कारंजात जंगी स्वागत

  पदोपदी राष्ट्रवादी या उक्तीचा प्रत्यय १४ जून रोजी आला,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांचे पुंजानी कॉम्प्लेक्स कारंजा रात्री १२.३० आगमन झाले इतका उशीर होऊन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस प्रेमी नागरिकांनी युसुफ पुंजानी यांचे निवासस्थानी उपस्थिती दर्शविली  जयंत पाटील यांचे यावेळी आतिषबाजी करून जंगी स्वागत करण्यात आले.याप्रसंगी जयंत पाटील यांनी नगरपालिका निवडणुकीसह विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले, तद्नंतर  जयंत पाटील यांनी मो युसुफ पुंजानी यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी पुंजानी परिवाराकडून त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, 
 यावेळी हाजी मो युसुफ पुंजानीसह, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके,अमरावती जिल्हा पक्ष निरीक्षक  सोनलिताई ठाकूर,यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक  अशोक परळीकर, माजी नगराध्यक्ष  चंद्रकांत परळीकर, प्रदेश सरचिटणीस  बाबरावजी खडसे, मानोरा नगराध्यक्ष  हेमेन्द्र ठाकरे,   देवव्रत डहाके,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे  अनंता काळे आदी सह कारंजा मानोरा नगरपालिका पदाधिकारी व नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments