Ticker

6/recent/ticker-posts

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. २८,४००/- रू जुगार साहीत्य व गावठी हातभट्टीची दारू जप्त


मा. श्री बच्चन सिंह पोलीस अधिक्षक यांनी वाशिम जिल्हयातील अवैध धंदे करणाऱ्या इसमावर कारवाई करणेकरीता वेग वेगळे स्थानिक गुन्हे शाखेतील पथके तयार करून धडक मोहीम राबविण्यात बाबत आदेशित केले आहे.
दिनांक ११.०७.२०२२ व दिनांक १४.०७.२०२२ रोजी मा. पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी व अमलदार यांचे वेग वेगळे पथक तयार करून वाशीम जिल्यातील अवैध्यरित्या चालणा-या धंदयावर कार्यवाही करणे बाबत आदेशीत केले असता दिनांक ११.०७:२०२२ रोजी ग्राम इंझोरी येथे गावठी हात भट्टीची दारु गाळुन विकी करणार कैलास पांडुरंग दिपडे यांचे वर प्रोव्होशन रेड केली असता त्यांचे ताब्यात गावठी हात भट्टीची दारु ३० लिटर किमत ६००० रु व मोहा सड़वा मार्च ११५ लिटर किमत ११५००रु असा एकुण १७५०० चा माल मिळून आला तसेच पोलीस स्टेशन आसेगाव हदीत मिळालेल्या गुप्तबातमीवरून ग्राम वारा जहागीर येथे जुगार खेळणारे इसमांवर छापा मारन कार्यवाही केली असता जुगार खेळणारे एकुण ८ इसमांना जागीच पकडुन त्यांचेकडुन १०९००/-रु जप्त करण्यात आले आहे. अशा प्रकारे दोन ठिकाणी छापे मारुत ९ इसमांविरुध्द कारवाई करून त्यांचेकडुन २८४००/- रु माल हस्तगत करण्यात आला आहे. उपरोक्त कारवाई मा. श्री बच्चन सिंह पोलीस अधीक्षक श्री गोरख भामरे अपर पोलीस अधीक्षक व सोमनाथ जाधव पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे, सपोनि प्रमोद इंगळे, विजय जाधव गजानन अवगळे, मुकेश भगत, दिपक सोनोने, पोना प्रविण राउत, अमोल इंगोले, किशोर खंडारे राम नागुलकर, गजानन गोटे महिला पोहवा सुषमा तोडकर, तहेमिना शेख यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments