स्थानिक- रिसोड येथील स्व.पुष्पादेवी पाटील महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये डॉ.रणजीत पाटील यांच्या सदिच्छा भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जीवन विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.बाबाराव खडसे पाटील साहेब , तर प्रमुख अतिथी स्थान मा. रणजीत पाटील साहेब (माजी गृहराज्यमंत्री) यांनी भूषविले. याप्रसंगी मंचावर संस्थेचे सचिव अमित पाटील, श्री.पियुष पाटील, प्राचार्य आदिनाथ बदर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना डॉ.रणजीत पाटील यांनी विस्तृत अशा अमरावती पदवीधर मतदार संघामधून प्रचंड मताधिक्यातून पुनश्च एकवेळ संधी द्यावी असे आवाहन करताना पदवीधरांच्या नोंदणीमध्ये आणखी वाढ अपेक्षित असल्याचे सांगून मोठ्या प्रमाणामध्ये नोंदणी करणे गरजेचे असल्याचे मत प्रतिपादन केले. पदवीधरांच्या अडचणी, समस्या समजून घेत त्यावर नक्कीच उपायोजना केल्या जातील प्रश्नांची सोडवणूक केली जाईल असे आश्वासन या प्रसंगी दिले. आपल्या अध्यक्ष भाषणातून सन्माननीय बाबारावजी खडसे पाटील यांनी अतिशय सक्षम नेतृत्व निवडून देण्याची जबाबदारी ही मतदारांवर असते आणि यावेळी मतदार ही जबाबदारी ओळखून आपले मतदान योग्य उमेदवारास करतील असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव कोकाटे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments