Ticker

6/recent/ticker-posts

1 ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्यातील पाटी येथील पुर्णानदीत वाहुन गेलेल्या इसमाचा शोध चालु

...............................
1 ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्यातील पाटी येथील जानराव महादेवराव आळे वय अंदाजे (75) वर्ष हे सकाळी पुर्णानदीच्या प्रवाहात वाहुन गेल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांना देण्यात आली यामध्ये काल दुपारी गांधीग्राम येथुन पुर्णानदीत एक मृतदेह वाहुन जात असताना उपस्थित नागरिकांनी पाहला अशी माहिती दहीहांडा पो.स्टे ठाण्यातुन प्राप्त झाली काल दुपारी शोध घेतला असता काहीच मिळुन आले नाही आज सकाळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे सर यांच्या आदेशाने आ.व्य.अ.संदीप साबळे यांच्या  मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती टीमचे सुनिल कल्ले तलाठी,हरीहर निमकंडे तलाठी,आणी सहभागी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या  संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे जवान आणी वंदेमातरम आपत्कालीन पथकाचे जवान यांनी गांधीग्राम ते नेर धामणा पर्यंत  पुर्णानदीत रेस्क्यु बोटद्वारे सर्च ऑपरेशन  राबविले असता काहीच मिळुन आले नाही उद्या सकाळी पुन्हा नेर धामणा प्रकल्पा पासुन पुढे सर्च ऑपरेशन राबविण्यात येईल अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथका दीपक सदाफळे यांनी दीली आहे.

Post a Comment

0 Comments