Ticker

6/recent/ticker-posts

शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला आग दोन बैल, एक गोरा, एक गाय जागीच ठार व इतर साहित्याची झाली राख रांगोळी यामुळे शेतकऱ्याचे झाले खूप मोठे नुकसान..

शेतकऱ्याचे आसू थांबता थांबेना प्रशासन मदत करेल का रडून रडून शेतकऱ्याचे बेहाल
   

 आभाळ नवे नशीब फाटले 
हा आकात पाहून शंकर च्या
 डोळ्यातले पाणी आटले 

मंगरुळपीर तालुक्यातील पारवा येथील शंकर विठ्ठल सावके यांच्या  जनावरांच्या गोठ्याला 9 ऑगस्ट च्या  मध्यरात्री  अचानक आग लागुन दोन बैल, ऐक गोरा , एक गाय, व संपुर्ण कोठा जळुन खाक झाले.  यामध्ये शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे.  संबंधित विभागाने तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

शंकर सावके यांचा दोन वर्षांपूर्वी विहिरीत पडून मोठा अपघात झाला होता या अपघातात शंकर सावखेडा यांच्या दोन्ही पायाचे ऑपरेशन करायचे काम पडले त्याही वेळी कोणत्याही प्रकारची प्रशासनाची मदत मिळाली नाही यामधून कसेबसे सावरत आपल्या संसाराचा गाडा पुढे नेत बँकेचे कर्ज काढून शंकर सावके  यांनी आपल्या शेतात पेरणी केली होता होता नव्हता पैसा शेतीला लावला दवाखान्यासाठी झालेले कर्ज फेडता येईल व आपला प्रपंच घरसंसार पुन्हा उभा करता येईल या हेतूने शेतात पेरणी केली होती निसर्गाने पुन्हा घाला घातला आणि संपूर्ण शेतात अडाण नदीचे पाणी घुसून  दोन दिवसापूर्वी दि 7, 8 ,2022 रोजी मोठे नुकसान झाले प्रशासनाची यातही कुठल्याही प्रकारची अद्याप पर्यंत मदत मिळाली नाही . तिसऱ्यांदा पुन्हा निसर्गाने शंकर सावके यांच्यावर घाला घातला  9/8/2022  रोजी मोठे संकट कोसळले यामध्ये मध्यरात्री  अचानक शॉक सर्किटने आग लागुन दोन बैल, ऐक गोरा , एक गाय, व शेती उपयोगी अवजारे व संपुर्ण कोठा जळुन खाक झाले. प्रशासनाच्या अधिकाऱ्याने अहवाल तर सादर केला मात्र पुढे काय शंकर सावके यांना वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मदत करतील का मुख्यमंत्री साहेब शंकर सावके यांच्या कुटुंबावर झालेल्या अपघाताच्या माध्यमातून मदत घेऊन आपलेही पाय यांच्या दाराला लागू द्या म्हणजे प्रशासनांना आणि शासनाला शंकर सावके यांचे सांत्वन तरी करता येईल आदरणीय मायबाप साहेब अध्यापपर्यंत यांच्या पाहणी साठी जिल्ह्यातील मोठे अधिकारी आलेच नाही.

Post a Comment

0 Comments