Ticker

6/recent/ticker-posts

सॅनिटरी पॅड ची योग्य विल्हेवाट काळाची गरज... सामाजिक कार्यकर्त्या सौ. अश्विनी राम औताडे.

                                            
मंगरूळपीर तालुक्यात
नुकताच पाळी महोत्सव पार पडला ही खूप सकारात्मक गोष्ट आहे महिलांसाठी. मुलीच्या बापानेच आपल्या मुलीचा पाळी महोत्सव साजरा करणे म्हणजेच समाजात  तसेच पुरुषी मानसिकतेत झालेला बदल हा चांगला आहे. ज्या विषयावर महिलाच बोलायला तयार नसतात तीथे  मुलीच्या बापाने मोकळ्या मनाने विचार मांडले. मासीक पाळी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ही गोष्ट तेवढ्याच सहजतेने सगळ्यांनी घ्यायला पाहिजेत पण या विषयावर बोलले जात नाही. तरी पण पूर्वीपेक्षा बदल झाला आणि हा विषय घेतल्या जातो. या काळामध्ये  महिलांनी घ्यायची काळजी  तसेच सॅनिटरी पॅड वापरणे विषयी खूप जास्त जनजागृती होऊन त्यावर एक पॅडमॅन हा सिनेमा पण निघाला. मोठ्या प्रमाणात राज्य शासनाकडून तसेच वेगवेगळ्या संस्थेकडून सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करून मुलींना व महिलांना  देण्यात येत आहेत. पण या सॅनिटरी पॅडची योग्य विल्हेवाट लावल्या जात नाही . या  विषयी तेवढी जनजागृती नाहीये व कुठलाही पर्याय उपलब्ध करून दिल्या जात नाही. शाळा, कॉलेजेस तसेच शासकीय कार्यालय किंवा खाजगी कार्यालय जिथे महिलांना सात किंवा आठ तास ड्युटी करावी लागते अशा ठिकाणी त्यांना स्वच्छ स्वच्छतागृह तसेच सॅनिटरी डिस्पोजल मशीन किंवा इतर पर्याय पॅड चेंज केल्याच्या नंतर ते टाकण्यासाठी  उपलब्ध करून देणे हे तेवढेच गरजेचे आहे. गेली दोन वर्षे झाले मी वाशिम जिल्ह्यामध्ये सॅनिटरी पॅड ची योग्य विल्हेवाट याविषयी जनजागृती करत आहे. सॅनिटरी पॅडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असते त्यामुळे याचा निसर्गावर तसेच मानवी जीवनावर खूप जास्त परीणाम होतो . पॅडमुळे प्रदूषणामध्ये खूप जास्त वाढ होते. त्यामुळे त्याची योग्य विल्हेवाट लावणे काळाची गरज आहे. हे पॅड सहजासहजी डिस्पोजल होत नाही. बाहेर टाकलेले पॅड वर्षन वर्ष तिथेच पडून राहतात.   कॉलेजमध्ये किंवा कार्यालय मध्ये किंवा इतर ठिकाणी तिथे काही पर्याय उपलब्ध नसला तर ते फ्लॅश केले जातात किंवा खिडकीमधून बाहेर टाकले जातात याने खूप जास्त प्रदूषण होत आहे. कारण वापरलेले पॅड आपण पर्स किंवा बॅगमध्ये कॅरी करू शकत नाही त्यामुळे ते बाहेरच टाकावे लागतात तिथे जर मशीन लावल्या गेल्या किंवा इतर पर्याय उपलब्ध करून दिले तर हे प्रदूषण टाळले जाईल आणि महिलांना मुलींनाही काही त्रास होणार नाही पॅड चेंज करायला. या जनजागृतीच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी मशीन लागल्या गेल्या व महिलांना मुलींना त्याचा फायदा  झाला, पण पाहिजे तेवढ्या प्रमाणात नाही. मंगरूळपीर पोलीस स्टेशनला ही मशीन लावल्या गेली तसेच लवकरच एस पी कार्यालय वाशिम येथे पण जनजागृती  कार्यक्रम घेऊन मशीन लावण्यात येणार आहे. याचबरोबर प्रत्येक ठिकाणी महिलांसाठी व मुलांसाठी स्वच्छतागृह असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण चांगलं स्वच्छतागृह असल्याशिवाय ह्या गोष्टी शक्य नाही. जनजागृती चे काम जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये आहे तसेच आदिवासी भागांमध्ये जिथे या महिलांना आरोग्याची काळजी कशी घ्यायची व पॅड वापरणे विषयी व त्याचे विल्हेवाट लावणे विषयी मार्गदर्शन केले जाते.

Post a Comment

0 Comments