Ticker

6/recent/ticker-posts

समाजसेवक संजू आधार वाडे यांचा पुढाकार मंगरूळपिर तालुक्यात विविध ठिकाणी रक्षाबंधन

पालावरील महिला समवेत रक्षा बंधन कार्यक्रम उत्साहात 
मंगरूळपिर ( ता.प्र)  दि 11 
मंगरूळपिर येथील बसस्थानक परिसरात असलेल्या पालावरील महिलानी समाजसेवक संजू आधार वाडे यांना राखी बांधून रक्षा बंधन कार्यक्रम दि 11 रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला 
 
समाजसेवक संजू आधार वाडे गेली 17 वर्षापासुन रक्षा बंधन कार्यक्रम आयोजित करीत असून यावर्षी मंगरूळपिर तालुक्यातील चिखली येथील शासकीय मुला मुलींचे वसतिगृह असून या वसतिगृहातील 100 मुलीच्या हस्ते संजू वाडे यांना राखी बांधण्यात आली 
तसेच शहरातील   गणेश नगरात व मंगरूळपिर तालुक्यातील मोहरी येथे रक्षा बंधनाचा कार्यक्रम पार पडला 
या रक्षा बंधन कार्यक्रमात समाजसेवक संजू वाडे यांनी बहिणीला स्नेह भेट दिली असून असा उपक्रम यापूर्वी वाशिम जिल्ह्यात कुणीच घेतला नसून या उपक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असून हा रक्षा बंधन कार्यक्रम दरवर्षी अव्यातपणे सुरू राहणार आहे या उपक्रमामध्ये प स युनूस खान, अश्विनीताई अवताडे,अतुल  उमाळे, सचिन मांढरे, शेख नवेद, आदींनी पुढाकार घेतला होता

Post a Comment

0 Comments