मंगरुळपीर शहरातून ता ११ रोजी पोलीस विभागाच्या वतीने हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत जनजागृती करण्यासाठी मोटर सायकल रॅली काढली.
स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्ग देशभरात अभियान राबविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने पोलीस विभागाच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथून प्रारंभ होऊन शहरतील भगतसिंह चौक,बिरबलनाथ चौक,सुभाष चौक चौक,दर्गा चौक,राजस्थानी चौक,नासरजंग चौक,अकोला चौक,बायपास रोड,महात्मा फुले चौक,बस स्थानक चौक,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गाने रॅली काढून पोलीस स्टेशनला रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये ठाणेदार सुनील हुड,नायब तहसीलदार रवी राठोड,एपीआय शिवचरन डोंगरे,निलेश शेंम्बडे,तुषार जाधव,मंजुषा मोरे,पीएसआय संतोष आघाव,अंकुश वडतकर,मोरसिंग जाधव, यांचेसह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
0 Comments