महाराष्ट्र महीला विकास मंच `च्या माध्यमातुन महीलांच्या समस्यावर पुढील काळात काम करण्यासाठी संघटनेची भुमीका व जबाबदारी . काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठीच व सर्वाचे विचार मांडण्यासाठी , चर्चा.करून योग्य व महत्वाचे निर्णय घेण्यासाठीच ही मिटींग सर्वासाठी घेण्यात आली .तेव्हा अनेक जिल्ह्यातून सर्व या मिटींग मधे सहभागी झाले होते.
4 वाजता झूम मीटिंग प्रमुख मार्गदर्शक
कालिंदीताई पाटील (राज्य समन्वयक) आपले विचार मंथन करताना
स्त्रीचे पहिले रूप हे आई- जननी जन्मदात्रीचे. तसे तर आई या शब्दाची व्याख्या करणे कोणासही शक्य नाही. आई होणे सोपे पण आईपण निभावणे मात्र अवघड आहे. अशी ही आई. प्रत्येकाच्या जडणघडणीत आईचा खूप मोठा वाटा आहे. जगाच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान स्त्रिया झाल्या. त्यातही पराक्रमी कर्तृत्ववान आई होण्याचे भाग्यही अनेकींना मिळाले. पण एक मोठी खंत अशी आहे. ती विधवा झाल्यावर तिची कशा पद्धतीने हेळसांड केली जाते तिचे मंगळसूत्र काढणे कुंकू पुसणे बांगड्या फोडणे तिला पूजा विधीच्या वेळेस मान न देणे अशा अनेक विधवा महीलांच्या समस्यावर पुढील काळात काम करण्यासाठी संघटनेची भुमीका व जबाबदारी . काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठीच व सर्वाचीच मत , चर्चा.करून योग्य व महत्वाचे निर्णय घेण्यासाठीच ही मिटींग अनेक जिल्ह्यातील नेतृत्व करणाऱ्या कर्तुत्वान महिला आणि पुरुष यामध्ये सहभागी झाले होते


0 Comments