प्रतिनिधी:- सचिन राणे
स्थानिक श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालयातील, महिला सक्षमीकरण कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना आणि क्षितिज फौंडेशन जिल्हा वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 03 ऑगस्ट 2022 रोजी वनोजा गावापासून जवळपास 7 किलोमीटर अंतरावर काटेपूर्णा अभयारण्यातील फेट्रा या आदिवासी बहुल , अशा गावात महिलांना मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होतातच असे नाही. त्यातून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. हे जाणून घेऊन सैनिटरी पॅडस मोफत वितरण चा उपक्रम फेटरा गावात 2019-20 पासून राबविण्यात येत आहे.
आज दिनांक 03 ऑगस्ट रोजी सत्र 2022- 23 चा सॅनिटरी पॅडस चे वाटप शुभारंभ करण्यात आला .यावेळी एकूण 87 महिलांना सॅनिटरी पॅडस चे मोफत वाटप करण्यात आले. . प्रत्येक महिन्याला पहिल्या आठवड्यात फेटरा गावातील महिलांना सैनिटरी पॅडस उपलब्ध करून दिले जातील. हे सॅनिटरी पॅडस मोफत क्षितिज फौंडेशन जिल्हा वाशीम च्या संचालक स्नेहल चौधरी यांनी डोनर विनोद शाह मुंबई यांच्या कडून उपलब्ध करून दिले आहेत ,आणि भविष्यात देखील त्यांचे मोलाचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षा व त्यांचे आभार महाविद्यालयाचे वतीने मानले, तसेच फेटरा गावातील जि प प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गीताताई गायकवाड यांनी आपला वेळातला वेळ काढून उपस्थिती दर्शवली त्यांचे देखील आभार, फेटरा गावातील सौ. आशा दिनेश सिंकटवार सौ कल्पना सुनील सिंकटवार यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपुलकीने, अगत्याने आम्हाला सहकार्य केले त्यांचे देखील आभार, या उपक्रमात फेटरा गावातील महिलां च्या उत्स्फूर्त सहभागासाठी आभार समन्वयक डॉ ममता पा थ्रीकर यांनी मानले. या उपक्रमात प्रामुख्याने साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाचे श्रीमती साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देवेंद्र गावंडे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ ममता पाथ्रीकर, यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाला.
0 Comments