Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर पोलिसांची धडाकेबाज कारवाई , गोवंशांची चोरी करून त्यांची हत्या करून त्यांचे मांस अवैधरीत्या विक्री करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

गोवंशांची चोरी करून त्यांची हत्या करून त्यांचे मांस अवैधरीत्या विक्री करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पोलिसांची धडाकेबाज कारवाई

दि.०१.०८.२०२२ रोजी गुप्त बातमीदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे व पो. नि. सुनील हूड, ठाणेदार मंगरूळपीर यांचे आदेशाने दोन पंचांसमक्ष मंगरूळपीर ते मानोरा रोडवरील आरामशीन येथे जाऊन नाकाबंदी केली असता संध्याकाळी १९.४५ वाजता एक पांढऱ्या रंगाचे बोलेरो वाहन क्र. MH ३७ ॥ ४२३९ संशयितरीत्या दिसून आल्याने सदर वाहनाची तपासणी केली. सदर वाहनामध्ये मोठ्या लोखंडी बॉक्समध्ये त्यावर पिवळ्या रंगाची ताडपत्री झाकून गोवंशाचे मोठे मोठे मांसाचे तुकडे हे बर्फाचे तुकड्यांमध्ये झाकलेले दिसून आल्याने जागेवरच घटनास्थळ जप्ती पंचनाम्याप्रमाणे पंचासमक्ष जप्त केले. सदर वाहन व आरोपितांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन, मंगरूळपीर येथे आणून वाहनाचे कृषी उत्पन्न बाजार समिती. मंगरूळपीर येथे वजन केले असता सदर वाहनाचे संपूर्ण बर्फमिश्रीत गोवंश मांसासह ५६३५ किलोग्राम भरले.

तरी सदर वाहनामधील मास हे गोवंशांची चोरी करून त्यांची हत्या करून त्यांचे मास अवैधरीत्या पांढऱ्या रंगाचे बोलेरो वाहन क्र. MH ३७ T ४२३९ अंदाजे ८,५०,०००/- रुपये व बर्फमिश्रीत मांसाचे ५६३५ किलो ग्राम अंदाजे किंमत ३,५०,०००/- रुपये व मोबाईल व नगदी मिळून एकूण १२,११,४३०/ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहनातील इसम नामे १) मोहम्मद रईस मोहम्मद सईद, २) फैजान मोहम्मद अन्सार कुरेशी व ३) मोहम्मद तनवीर शेख बुरहान सर्व रा. कसाबपुरा, मंगरूळपीर, जिल्हा. वाशीम यांचेवर कलम ३७९, ३४ भादंवि सहकलम ५, ५ (क), ९ (अ) महाराष्ट्र प्राणी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments