Ticker

6/recent/ticker-posts

पुनश्च नंबर एक : 'डायल ११२ च्या प्रतिसाद वेळेत वाशिम पोलीस दल क्रमांक एकवर कायम, माहे जुलै २०२२ मध्ये गरजूंना ०६.२३ मिनिटांत मदत.

वाशिम पोलीस दलामध्ये १६ डिसेंबर, २०२१ पासून डायल ११२ हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरु करण्यात आला असून या प्रकल्पाचा उद्देश्य पिडीत जनतेला आधुनिक साधन व तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीत कमी वेळेत पोलीस मदत पोहोचविणे हा आहे. वाशिम पोलीस दलामध्ये या प्रकल्पाकरिता २४ चारचाकी वाहने व २१ दुचाकी वाहने कार्यरत आहेत. सर्व वाहनांवर डायल ११२ प्रकल्पाचे प्रशिक्षण घेतलेला प्रशिक्षित स्टाफसुद्धा तैनात करण्यात आला आहे. तक्रारदारांना त्वरित न्याय मिळावा, गरजू व्यक्तींना लवकरात लवकर मदत पोहोचावी यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल तत्पर असून नागरिकांची सुरक्षा हेच प्रथम ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाशिम जिल्हा पोलीस दल कर्तव्यरत
आहे. माहे जुलै-२०२२ मध्ये वाशिम घटकातील पो.स्टे. वाशिम शहर यांचा प्रतिसाद वेळ हा सर्वात कमी ०५.०१ मिनिटे

असून ते प्रथमस्थानी आहे. त्यानंतर पो.स्टे. अनसिंग ०५.११ मिनिटांसह द्वितीय स्थानी तर पो.स्टे. मालेगाव हे ०५.१३

मिनिटांसह तृतीय स्थानी आहे.

वारंवार कॉल प्राप्त होणाऱ्या ठिकाणची माहिती घेऊन संवेदनशील ठिकाणी पोलीस दलाचे वतीने डायल ११२ ये वाहनाकरीता वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये फिक्स पॉइंट लावून गस्तीचा विभाग ठरवून दिलेला आहे. त्यामुळे पिडीत व्यक्तींना कमीतकमी वेळेत प्रतिसाद मिळत असून गुन्हेगारी कृत्यांना आळा बसला आहे. त्याचाच परिणाम म्हणून वाशिम जिल्हा पोलीस दल डायल ११२ च्या प्रतिसाद वेळेमध्ये क्रमांक एकवर कायम आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीला वाशिम जिल्ह्याचा प्रतिसाद वेळ हा माहे सप्टेंबर २०२१ मध्ये २५ मिनिटे १० सेकंद मिनिटे होता तो माहे जुलै-२०२२ मध्ये सरासरी ०६ मिनिटे २३ सेकंद इतका असून प्रतिसाद वेळ हा जवळपास ७५% ने कमी झाला असून त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून वाशिम जिल्हा पोलीस दल प्रतिसाद वेळेत प्रथम स्थानी विराजमान आहे. भविष्यात नागरिकांना ०५ मिनिटांच्या आत मदत पोहोचवण्यासाठी वाशिम पोलीस दल प्रयत्नशील आहे. डायल ११२ हा प्रकल्प गरजूंना तत्काळ पोलीस मदत मिळावी यासाठी सुरु करण्यात आला आहे परंतु काहीजण डायल ११२ चा गैरवापर करतात, मस्करी करतात अशांविरुद्ध यापूर्वी पोलीस कारवाई करण्यात आल्या आहेत.

सदर प्रकल्पामध्ये मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री गोरख भामरे (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनीषा तायडे, सुपरवायझर, डायल ११२, वाशिम यांच्या नेतृत्वाखाली डिस्पॅचर पोहवा, वसंत इंगोले, पोहवा. पंढरीनाथ दराडे, नापोकॉ. मोहित वाघमारे, नापोका, अनंता लहाने, पोकॉ. मंगेश नरवाडे, पोकॉ.गणेश तागड, पोका. आत्माराम बोरकर, पोका रामकिसन उगले, पोका, राजेंद्र शिंदे, मपोका. आरती निकम आणि जिल्हास्तरावरील २६२ ERY स्टाफ यांनी डायल ११२ प्रकल्पामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिसाद वेळेत वाशिम जिल्हा प्रथम येण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments