Ticker

6/recent/ticker-posts

हर घर तिरंगा’ हा उपक्रम वाशिम शहरात यशस्वी करा -जिल्हाधिकारी एस. षण्मुगराजन यांचे आवाहनन.प. अग्नीशमन केंद्रात ध्वज विक्रीसाठी उपलब्ध - दिपक मोेरे


वाशिम - भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम १३ ते १५ ऑगष्ट या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना व महाराष्ट्र शासनाचे दिशानिर्देशानुसार राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वाशिम नगर परिषदकडून शहरातील सर्व नागरीकांना ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ‘राष्ट्रध्वज’ सहजपणे उपलब्ध व्हावा यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नगर परिषद अग्नीशमन केंद्रात जिल्हाधिकारी एस. षण्मुगराजन यांचे हस्ते ४ ऑगष्ट रोजी ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

    ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम वाशिम शहरात यशस्वी करा असे आवाहन यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी केले. भारतीय ध्वजसंहितेचे पालन होईल तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान होवू नये याची दक्षता घेण्याबाबत आपण सर्वांनी काळजी घ्यावी व नागरिकांमध्ये जाणीवजागृती निर्माण व्हावी असे जिल्हाधिकार्‍यांनी उल्लेखित केले. शहरात नागरीकांसाठी न.प. अग्नीशमन केंद्राच्या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने ध्वज उपलब्ध करुन देण्यात आले असून नागरीकांनी या ठिकाणी ध्वज खरेदी करावे असे यावेळी मुख्याधिकारी दिपक मोरे यांनी म्हटले. याप्रसंगी न.प. प्रशासक प्रकाश राऊत,तहसिलदार विजय साळवे, शहर पोलीस निरिक्षक रफीक शेख, अशोक अग्रवाल, विजय घुगरे, कपिल देवकर तसेच नगर परिषद महिला बचत गटाच्या महिला आणि सर्व न.प. कर्मचारी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार उज्वल देशमुख यांनी केले.

Post a Comment

0 Comments