मातोश्री शांताबाई गोटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने निर्देशित केल्याप्रमाणे पदवीदान समारंभ दि. 06 ऑगस्ट 2022 ला घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभू श्री रामचंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. नारायणराव गोटे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ विद्या परिषदेचे सदस्य डॉ. सुभाष जाधव हे होते. तसेच पंचफुलाबाई पाटील समाजकार्य महाविद्यालय येथील डॉ. संकेत काळे, सुमित गोटे, डॉ. व्ही.एन.लांडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विष्णू लांडे यांनी केले. आपल्या मार्गदर्शनात डॉ. संकेत काळे यांनी विद्यार्थ्यांनी केवळ पदवी घेऊन समाधानी न राहता सतत नव-नवीन कौशल्य शिकत आपला व देशाचा विकास करण्याचे आवाहन केले. डॉ. सुभाष जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थी जीवनामध्ये पदवी प्राप्त करणे हा एक मोठा टप्पा मानला जातो. यानंतर विद्यार्थी खऱ्याअर्थाने नवीन आयुष्याला सुरूवात करतो. नवीन आयुष्याला सुरूवात करताना त्याच्यासमोर अनेक अडथळे व आव्हाने असतात ते सर्व स्वीकारत विद्यार्थ्यांने स्वताची प्रगती करणे हेच त्याचे अंतिम ध्येय असले पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट असा एक गुण असतो, एक कला असते, एक कौशल्य असते ते ओळखून त्यांनी त्या दिशेने वाटचाल करावी तरच तो जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो असे मत त्यांनी मांडले. याप्रसंगी उपस्थितांच्या हस्ते वाङ्मय स्नातक, वाणिज्य स्नातक व विज्ञान स्नातक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. नारायणराव गोटे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपले स्वप्न साकार करीत समाजसेवेचे व्रत देखील अंगीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. दिपक दामोदर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. वेदप्रकाश डोणगांवकर यांनी मानले. सदर कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह बहुसंख्य पदवीप्राप्त विद्यार्थी उपस्थित होते.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments