Ticker

6/recent/ticker-posts


वाशिम - धनादेश अनादरप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एस. घोरपड़े यांनी येथील अशोक गोविंदराम बसंतवानी यांना तीन महिने साधा कारावास आणि फिर्यादीने प्रकरण दाखल केल्यापासुन ६ टक्के व्याजासह १ लाख २० हजार रुपये फिर्यादीला नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. तसेच नुकसान भरपाई दोन महीन्याच्या आत न दिल्यास अजुन एक महीना साध्या करावास भोगावा लागेल असे आदेशात नमुद केले आहे.अशोक बसंतवानी यांनी श्री अंबिका अर्बन मल्टीस्टेट को. ऑफ क्रेडीट सोसायटीच्या वाशिम शाखेतून दैनंदिन कर्जफेड योजनेअंतर्गत एक लाख रुपये १६ फेब्रुवारी २०१५ रोजी फिर्यादी संस्थेच्या अटी व शर्ती मान्य करुन कर्ज घेतले होते. मात्र या कर्जाचा त्यांनी नियमित स्वरुपात भरणा केला नाही. त्यामुळे संस्थेचे प्रभारी शाखाधिकारी दिपक इंगोले यांनी त्यांच्याकडे वेळोवेळी थकीत कर्जाची मागणी केली होती. त्यावेळी अशोक बसंतवानी यांनी सदरील कर्जाबाबत रोख रक्कम न देता फिर्यादी संस्थेच्या नावाने आरोपींच्या खात्याचा पंजाब नॅशनल बँक शाखा वाशिमचा रुपये १,१८,१४२ चा धनादेश २२ मार्च २०१७ रोजी दिला होता. व धनादेश देतेवेळी आरोपीने आश्वासन दिले होते की, सदरचा धनादेश हा हमखास वटविल्या जाईल. परंतु सदरचा धनादेश हा वटविण्यास लावला असता तो खात्यात पुरेशी रक्कम नसल्याकारणाने अनादरीत झाला. त्यामुळे संस्थेचे प्रभारी शाखाधिकारी दिपक इंगोले यांनी प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात संस्थेचे विधीतज्ञ पवन गट्टानी यांच्यामार्फत अशोक बसंतवानी यांच्याविरोधात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम १३८ अंतर्गत प्रकरण दाखल केले होते. प्रकरणात उभय बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर व न्यायनिवाड्याचे अवलोकन करून मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एस. घोरपड़े यांनी ५ऑगस्ट २०२२ रोजी अशोक बसंतवानी यांना तीन महिने साधा कारावास आणि फिर्यादीने प्रकरण दाखल केल्यापासुन ६ टक्के व्याजासह १ लाख २० हजार रुपये फिर्यादीला नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. तसेच नुकसान भरपाई दोन महीन्याच्या आत न दिल्यास अजुन १ महीना साध्या करावास भोगावा लागेल अशी शिक्षा ठोठावली. फिर्यादी संस्थेच्या वतीने अ‍ॅड. पवन गट्टानी यांनी काम पाहीले.

Post a Comment

0 Comments