भारताच्या स्वातंत्र्याला यंदा ७५ वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल शासनातर्फे दि. ०१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आजादी का अमृत महोत्सव' हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत शासनाच्या विविध विभागामार्फत भारताचे स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. सदर कालावधीमध्ये वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे विविध उपक्रम राबविणे संदर्भात मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांचे अध्यक्षतेखाली अमृत महोत्सव समन्वय समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली. सदर बैठकीत झालेल्या चर्चेप्रमाणे वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे खालील प्रमाणे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
१) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशन पोलीस चौकी व पोलीस वसाहत येथे १२ ते १५ ऑगस्ट दरम्यान तिरंगा झेंडा फडकवणे. २) वाशिम पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील सर्व पोलीस आमदार व अधिकारी यांना एकूण १७०० तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले आहे व सदर अंमलदार हे आपल्या निवासस्थानी तिरंगा झेंडा फडकवतील. ३) अमृत महोत्सवी दौड' या उपक्रमांतर्गत वाशिम पोलीस मुख्यालय येथील अंमलदार हे ७५ किलोमीटर अंतर धावून पार करणार आहेत. ४) पोलीस अधीक्षक कार्यालय येथे तिरंगा विद्युत रोषणाई तसेच अमृत महोत्सवाचे संदेश देणारे फलक व तिरंगा झेंडा लावण्यात आले आहे. ५) वाशिम शहर व तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. ६) पोलीस अधीक्षक कार्यालय व तालुका पोलीस स्टेशन येथे शस्त्रास्त्रे, श्वान पथक, पोलीस बँड, घातपात विरोधी पथक यांचे प्रदर्शन घेण्यात येणार असून त्यादरम्यान विविध शाळांच्या विद्यार्थी व नागरिक यांना भेट देण्यासाठी निमंत्रित करण्यात येत आहे. ७) जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन तसेच निर्भया पथक महिला दक्षता कक्ष यांचे मार्फत जिल्ह्यातील ७५ शाळांमध्ये महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा अमली पदार्थ इत्यादी विषयांवर जनजागृती पर कार्यक्रम घेतले जात आहेत. ८) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय मार्फत अमृत महोत्सवचे संदेश देणारे बॅनर सर्व पोस्टर यांना वाटप करण्यात येत असून त्यांना दर्शनी भागामध्ये लावण्याची सूचना देण्यात येत आहे. ९) माननीय न्यायालयाच्या परवानगीने फिर्यादींना किमती मुद्देमालाचे वाटप केले जात आहे.
आज दि.०६.०८.२०२२ रोजी झालेल्या गुन्हे आढावा बैठकीमध्ये मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS) यांनी आझादी का मृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले व सूचना दिल्या. वरील प्रमाणे विविध कार्यक्रम वाशिम जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी व अंमलदार यांचेमार्फत उत्स्फूर्तपणे साजरी केली जात असून वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्याचा अमृत •महोत्सव हा उपक्रम उत्साहाने साजरा करून तसेच घरोघरी झेंडा' उपक्रमांतर्गत आपले घरावर तिरंगा फडकवण्याचे. आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
0 Comments