तसेच दि.०५.०८.२०२२ रोजी मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींबाबत मिळालेल्या गोपनीय माहिती वरून स्था.गु.शा. येथील पथक ग्राम दुसरबीड जि. बुलडाणा व जाफ्राबाद जि.जालना येथे रवाना केले असता मिळालेल्या माहितीप्रमाणे इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव हर्षद भगवान गंगतीरे वय २९ वर्ष रा. दुसरबीड असे सांगुन त्याने व त्याचा मित्र नामे लहु परमेश्वर गवळी वय २२ वर्ष व राजु सुरेश गवळी वय २५ वर्ष दोन्ही रा. खासगाव ता. जाफाबाद जि.जालना या तिघांनी मिळुन मालेगाव शहरातुन २ मोटारसायकली चोरी केल्याबाबत सांगीतले. त्यावरून खासगाव जाफ्राबाद येथे जावून लहु परमेश्वर गवळी यास ताब्यात घेतले. हर्षद गंगतीरे यांचेकडुन होंडा कंपनीची युनिकॉन मॉडेलची मोटार सायकल रंग काळा जिचा चेसीस नं.ME4KC41HLA047845 व इंजीन नं. KC40EA0078364 अशा वर्णनाची किमंत १२५००० /- रूपयाची व आरोपी लहु परमेश्वर गवळी याचेकडुन रॉयल इन्फील्ड कंपनीची काळया रंगाची बुलेट जिचा चेसीस नं. ME3U355C1H885116 व इंजीन नं.U3SSC1HE521408 अशा वर्णनाची जिची किमंत १५०००० /- रूपयाची जप्त करून ताब्यात घेवुन आरोपी हर्षद भगवान गंगतीरे वय-२९ वर्ष रा.दुसरबीड जि.बुलडाणा व लहु परमेश्वर गवळी वय २२ वर्ष रा. खासगाव ता. जाफ्राबाद जि. जालना यांना ताब्यात घेवुन पो.स्टे. मालेगाव येथील अप.नं.३०७/२२ कलम ३७९ भा.दं.वि. या गुन्ह्यात आरोपीसह ताब्यात दिली.
दि.०५.०८.२०२२ रोजी वाशिम शहरात पाटणी चौक अचानक नाकाबंदीचे आयोजन करून वाहने चैक करीत असतांना एका बजाज डिस्कव्हर या मोटारसायकलवर बसुन एक इसम जातांना दिसला त्यास थांबुवन त्याचे ताब्यातील गाडीचे कागदपत्रांची मागणी केली असता त्याने कोणतेही कागदपत्रे सादर केले नाही. तसेच मोटार सायकलचे दोन्ही बाजुच्या नंबरप्लेट नव्हत्या व नमुद मोटार सायकल चालकाची वर्तणक संशयास्पद दिसुन आल्याने सदर मोटार सायकल ताब्यात घेवुन त्याची बारकाईने पडताळणी केली असता नमुद इसमाने सदरची मोटार सायकल ही काही दिवसापुर्वी वाशिम शहरातुन महात्माफुले भाजी मार्केटमधुन चोरी केलेली असल्याचे सांगीतले. सदर मोटार सायकलचा चेसीस नं. MD2A51825DW815541 व इंजीन नं. PAZWDB55770 पडताळणी केली असता सदर मोटार सायकलबाबत पो.स्टे. वाशिम शहर येथे अप.नं. ६२३ / २२ कलम ३७९ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल झाला असल्याने सदर गुन्ह्यात नमुद आरोपी मनोज प्रल्हाद रणबावळे वय ३५ वर्ष रा. जांभरुणनावजी ता. जि. वाशिम याचेकडुन वरील वर्णनाची बजाज डिस्कव्हर मोटार सायकल किमंत २५०००/- रुपये जप्त करून आरोपी व मोटार सायकल पो.स्टे. वाशिम शहरचे स्वाधिन केले. अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन ठिकाणावरुन ३ वेगवेगळया कंपनीच्या वरील वर्णनाच्या मोटर सायकली ज्याची एकुण कि. ३,०००००/- रु च्या जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात, अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोमनाथ जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर, प्रमोद इंगळे, विजय जाधव, पोलीस हवालदार गजानन अवगळे, सुनिल पवार, दिपक सोनवणे, पोलीस नाईक मुकेश भगत, अमोल इंगोले, राजेश राठोड, राम नागलकर, प्रविण राउत, गजानन गोटे, पोकों किशोर खंडारे, डिंगावर मोरे, शुभम चौधरी, संतोष शेनकुडे म. पोहवा तहेमिना शेख यांनी केली आहे.
0 Comments