Ticker

6/recent/ticker-posts

करंजी येथे गरजु विद्यार्थीनीला शालेय साहित्य व गणवेशाची मदत


वाशिम - गत दोन वर्षापासून कोरोनामुळे गोरगरीब त्रस्त झाले असतांना आपल्या सेवाभावी वृत्तीतुन पिडीतांच्या जिवनाला नवी उभारी व दिलासा देण्याच्या उद्देशाने सामाजीक कार्यकर्ते जगदीश गोरे मित्रमंडळाच्या वतीने सुरु केलेल्या सामाजीक उपक्रमांतर्गत मालेगाव तालुक्यातील ग्राम करंजी येथील सुषमा लहाने या चिमुकल्या गरजु विद्यार्थीनीला पुस्तके, वह्या, शालेय साहित्य, बॅग व गणवेशरुपाने भरीव मदत करण्यात आली. अचानक मिळालेल्या या मदतीमुळे विद्यार्थीनींच्या चेहर्‍यावर आनंद पसरला होता.
    गेल्या दोन वर्षात कोरोना साथीने पिडीत लोकांना जगदीश गोरे मित्रमंडळाने स्वखर्चातून अन्नधान्य व कपडे आदीच्या रुपाने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना भरीव मदत मिळाली असून मित्रमंडळाच्या या सेवाभावी वृत्तीने सर्वत्र कौतूक होत आहे. अशातच ज्या विद्यार्थीनीचे मातृपितृ छत्र हरवले आहे अशा विद्यार्थीनींना मोफत शालेय साहित्य, गणवेश अशी मदत देण्यासोबतच त्या मुलींचा शैक्षणिक खर्चाचा भार उचलण्याचा निर्णय जगदीश गोरे मित्रमंडळाने घेतला आहे. या मित्रमंडळामध्ये जगदीश गोरे, भागवत चौधरी, भिसेकाका आणि मित्रपरिवाचा समावेश आहे. या निर्णयातुनच करंजी येेथे एका गरीब, होतकरु व अभ्यासु विद्यार्थीनीला शालेय साहित्याची मदत करण्यात आली. यापुढे मातापिता नसलेल्या गरजु विद्यार्थीर्नींना मदत करण्याचा मानस जगदीश गोरे यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments