मंगरूळपीर :- येथील अभ्यासा इंग्लिश स्कूल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष आत्माराम चव्हाण यांचा वाढदिवस 2 ऑगस्ट रोजी विविध उपक्रमाने व ग्रीन डे म्हणून साजरा करण्यात आला
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिलीप भाऊ मोहना वाले माजी जिल्हा सदस्य ,प्रमुख पाहुणे सौ जमेला ताई मोहना वाले ,पंडित इंगोले ,प्रकाश उंद्रे ,गोपाल मोरे ,प्रेम चव्हाण ,रमेश राठोड ,प्रेम राठोड , संपादक सुधाकर चौधरी , पत्रकार डॉ सुधाकर शिरसागर, राजूभाऊ दबडे, राजकुमार ठाकूर ,दयाराम भाऊ चव्हाण ,राजू सरदार ,यांची प्रमुख उपस्थिती होती वाढदिवसानिमित्त शाळेच्या परिसरात अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते 51 झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर येथे पेशंटला फळ वाटप करण्यात येऊन अपंग निवासी विद्यालय जाम रोड येथे मुलांना शालेय साहित्य व फळ वाटप करण्यात आले संस्था अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये हिरवे पोशाख घालून विद्यार्थ्यांनी वृक्षरोपण दिंडी काढून व वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश दिला
वाढदिवसानिमित्त अध्यक्ष आत्माराम चव्हाण यांचा शाळेच्या मुख्याध्यापिका रेशमा चव्हाण यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला सर्व शिक्षक कर्मचारी यांनी अध्यक्ष यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले तसेच सर्व प्रमुख पाहुणे यांनी अध्यक्ष यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे ग्रीटिंग बनवून पर्यावरणावर चांगला संदेश दिला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका स्नेह मेश्रा ,काजल कंटाळे ,दर्शना दीक्षित ,पल्लवी गोरडे ,रेणुका पवार ,स्नेहा काबरा, कल्पना पातुरकर, कर्मचारी वर्षा सोनोने .वर्षा भगत ,चंदन राठोड यांनी परिश्रम घेतले
या कार्यक्रमाचे संचालन रेणुका पवार व आभार प्रदर्शन पल्लवी गोरडे यांनी केले या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व मान्यवरांच्या डोळ्याचे पारणे फिटले खरोखर वाढदिवस साजरा करावा तर असा



0 Comments