मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक ०१/०८/२०२२ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयातील मिटींग हॉल येथे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय वाशिम अंतर्गत विशेष बाल पोलीस पथक यांचेकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. वाशिम जिल्हयात बालस्नेही यंत्रणा निर्माण करण्यासाठी व बालकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपक्रम कार्यान्वित करण्यात आले आहेत.
जिल्हयातील प्रत्येक पोलीस स्टेशन हे बालस्नेही पोलीस स्टेशन करण्याचा मा. पोलीस अधिक्षक यांचा मानस असून बालकांच्या तकारींचे निराकरण करण्यासाठी ते नेहमी आग्रही असतात.
बालन्याय काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ अंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि पोलीसांमध्ये बालस्नेही वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. बालस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, विशेष बाल पोलीस पथक, बाल कल्याण पोलीस अधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या यंत्रणाची जबाबदारी आहे. सदर यंत्राणाशी दोन प्रकारच्या बालकांचा संबंध येत असतो. त्यामध्ये एक काळजी व संरक्षणाची गरज असणारी बालके व दुसरे विधिसंघर्षग्रस्त बालके यांचा समावेश होतो. पोलीस स्टेशन स्तरावर बालकांना बालस्नेही वातावरण मिळण्यासाठी विशेष बाल पोलीस पथक व बाल कल्याण पोलीस अधिकारी यांची महत्वाची भूमिका असते.
त्यानुषंगाने विशेष बाल पोलीस पथक व बाल कल्याण पोलीस अधिकारी यांना बालकांसंबंधी असलेल्या विविध कायदयाची व योजनांची माहीती असणे आवश्यक असल्याने आज दि. ०१/०८/२०२२ रोजी मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, वाशिम यांचे अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या कार्यशाळेमध्ये ७ बाल कल्याण पोलीस अधिकारी व विशेष बाल पोलीस पथकातील १६ अमलदार हजर होते.
मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना सांगितले की, विशेष बाल पोलीस पथक व बाल कल्याण पोलीस अधिकारी यांना बालकांच्या कायदयाविषयीची माहीती असणे आहे. वाशिम जिल्हयात सद्यस्थितीत पो.स्टे. वाशिम ग्रामीण येथे एकाच ठिकाणी बालस्नेही पोलीस स्टेशन स्थापन असुन भविष्यात उपविभागीय स्तरावरील सर्व पोलीस स्टेशन बालस्नेही पोलीस स्टेशन करण्याविषयी मा. पोलीस अधिक्षक सा. यांनी प्रतिपादन केले आहे. सदर कार्यशाळेला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रियांका गवळी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले, कायदा तथा परिविक्षा अधिकारी जिंसाजी चौधरी, बालन्याय मंडळ सदस्य अँड. प्रतिभा वैरागडे दिशा मुलांचे निरीक्षण गृहाचे अध्यक्ष गोपाल मोरे यांनी बालन्याय अधिनियम २०१५, लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२ बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सदर कार्यशाळेला चाईल्ड लाईनचे अविनाश चौधरी शाहीद खान हजर होते.
0 Comments