Ticker

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ हा कार्यक्रम वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे उत्स्फूर्तपणे विविध कार्यक्रमाचे आयोजन

वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे       संपादक सुधाकर चौधरी

वाशिम जिल्ह्यात जंगी तयारी
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे पार्श्वभूमीवर ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ हा कार्यक्रम वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे उत्स्फूर्तपणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून राबविला जात आहे. आज दिनांक १२ ऑगस्ट, २०२२ रोजी वाशिम जिल्हा पोलीस दलामधील ७५ पोलीस अंमलदार, निर्भया पथक, पोलीस बँड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरुवात झालेल्या तिरंगा बाईक रॅलीमध्ये सहभाग घेऊन वाशिम शहरांमध्ये विविध शाळांना भेटी देऊन ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम साजरा केला.
त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथे मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी वाशिम पोलीस दलातर्फे शाळकरी विद्यार्थ्यांकरिता आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. सदर प्रदर्शनामध्ये पोलीस दलातर्फे वापरली जाणारे शस्त्रास्त्रे, श्वानपथक प्रात्यक्षिक, घातपात विरोधी पथकाद्वारा वापरले जाणारे यंत्रे, डायल 112, निर्भया पथक इत्यादी विषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी वाशिम शहरातील ०३ शाळांमधील एकूण ३५० विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली. तसेच तिरंगा सेल्फी पॉईंट येथे विद्यार्थ्यांनी उत्साहाने तिरंगा झेंडा सोबत फोटो काढले. सदर प्रदर्शनाच्या ठिकाणी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी विद्यार्थ्यांचे सोबत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संदेश देणाऱ्या बॅनर सोबत फोटो काढले व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. 
तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयद्वारे वाशिम जिल्ह्यातील सर्व अधिकारी व अंमलदार यांना आतापर्यंत १७०० तिरंगा झेंड्यांचे वाटप करण्यात आले असून सदर झेंडे हे अंमलदार यांनी आपले निवासस्थानी फडकवले आहेत. त्याचप्रमाणे ७५ किलोमीटर अंतराची ‘अमृत महोत्सवी दौड’ उपक्रम पोलीस मुख्यालय येथे राबविला जात आहे. वाशिम जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे संदेश देणारे बॅनरचे वाटप करण्यात आले असून सदर बॅनर पोलीस स्टेशन येथे दर्शनी भागात लावण्यात आलेले आहेत. महिला दक्षता पथक व निर्भया पथक यांनी विविध शाळांना भेटी देऊन महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा इत्यादी विषयी विद्यार्थ्यां मध्ये जनजागृती केली आहे.
वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे  पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबरोबरच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावरदेखील पोलीस स्टेशन तर्फे ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा’निमित्त प्रभात फेरी, तिरंगा रॅली, शाळा व महाविद्यालय येथे जनजागृती पर कार्यक्रम, घरोघरी झेंडा इत्यादी प्रकारचे विविध कार्यक्रम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविले जात आहेत.

Post a Comment

0 Comments