वाशिम- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय व सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई व्दारा स्थानिक जिल्हा कारागृहात आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 11 ऑगष्ट रोजी संस्कृती, देशभक्तीवर आधारीत जीवन गाणे गातच रहावे हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडून याला बंदीबांधवांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
जिल्हा कारागृहात आयोजित कार्यक्रमाला कौशल्य प्रशिक्षण केंद्राच्या आयुक्त सौ. सुनंदा बजाज, प्रभारी कारागृह अधिक्षक बि.एन.राऊत, तरूण क्रांती मंच जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, आर्ट ऑफ लिव्हींगचे डॉ. सुशिल देशपांडे, प्रशांत स्वामी, गायक शेख मोबीन, विजय चव्हाण आदिंची उपस्थिती होती. सर्वप्रथम श्री श्री रविशंकर यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात सुशिल देशपांडे यांनी ओंकार ध्वनी व श्री गणराया गणपती बाप्पा मोरया या भक्तीगिताने केली. तदनंतर गायक शेख मोबीन यांनी जहा डाल डाल पे सोनिया चिडीया तर सौ. संजीवनीताई यांनी ऐ मेरे वतन के लोगो, सौ. भाग्यश्री कांबळे यांनी देश मेरा रंगिला रंगिला, नशरूध्दीन शहा मेरे देश प्रेमिओ, शेख रशिद यह देश है विर जवानो का, शेख मोबीन यांनी चिढी आयी है, बंदी बांधव मनसुर शहा यांनी संदेशे आते है, फराज अहेमद खान यांनी मेरा मुल्क मेरा देश हे देशभक्तीवर गित सादर करून उपस्थितांना जिंकले. कलावंत धम्मानंद इंगोले, हरिषचंद पोफळे, अरविंद उचित यांनी वासुदेवच्या भूमिकेतून सामाजिक संदेश दिला. बि.एन. गृपच्या वतीने देशभक्तीपर तेरे मिटी मे मिल जाये याव्दारे देशाच्या विर जवानावर सुंदर प्रस्तुती सादर करण्यात आली. सदर कार्यक्रमात सुनंदा बजाज, डॉ. हरिष बाहेती, सुशिल देशपांडे, निलेश सोमाणी व अधिक्षक बि.एन. राऊत यांनी बंदीबांधवांना मार्गदर्शन केले. प्रत्येकांनी चांगले कार्य करून आत्मनिर्भय भारत अंतर्गत लवकरच कारागृहात सुरू होत असलेल्या प्रकल्पामध्ये प्रशिक्षण घेवून रोजगाराची संधीचे सोने करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. राजु डोंगरदिवे, प्रविण डोंगरदिवे यांनीही आपल्या कलाकृतीव्दारे उपस्थितांना जिंकले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हरिष बाहेती, संचालन निलेश सोमाणी तर आभार अधिक्षक बि.एन राऊत यांनी मानले.
0 Comments