मंगरुळनाथ
आपला देश सुजलाम् सुफलाम् तर आहेच संस्कृती व संस्कार हे भारताचे अंग आहे असे प्रतिपादन राष्ट्रसेविका आदीती महाजन
यांनी राजस्थानी चौकातील विठ्ठल मंदीरातील आयोजित भारत माता पुजन कार्यक्रमा प्रसंगी प्रतिपादन केले.
स्थानिक श्री विठ्ठल मंदीरात देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत माता पुजनाचा कार्यक्रम व देशभक्तिपर गीताचा कार्यक्रम दि.१० सप्टेंबर रोजी राष्ट्रसेविका समितीच्या वतीने पार पडला, त्या प्रसंगी शाखा लावण्याचे कार्य रेणुका दंडे यांनी केले तर ध्वज माधूरी महाजन यांनी फडकवला.त्या प्रसंगी पुढे म्हणाल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक
क्रांतीवीरांनी प्राणाची आहुती दिली त्यामुळे आपण सर्व स्वातंत्र भारतात राहत आहोत.त्यावेळी बौद्धीकच्या प्रमुख प्रवक्त्या संपदा घोडचर
म्हणाल्या की देशाच्या ७५व्या स्वातंत्र्योत्सवात
आपण घरोघरी तिरंगा फडकविला.सर्वांना
आनंद घेता आला,जसे एका धाग्यामुळे माळेमध्ये मणी एकत्र येतात तसेच आपण भारतवासी एकत्र आलो आहोत असे सांगितले.त्यावेळी देशभक्तीपर गीतांचा भरगच्च कार्यक्रम झाला.श्रोत्यांची उपस्थिती उलेखणीय
होती.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रेवती भालेराव यांनी तर सुत्र संचलन सुनिता घोडचर यांनी केले.वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाला सुमती महाजन,कल्याणी घोडचर माधुरी महाजन,आश्विनी गोगरकर,गौरी जामकर,मीना भालेराव,शोभा गोगरकर,लता
क्षीरसागर,सविता सुर्वे यांचे सह महीला राष्ट्र सेविका व बाल राष्ट्रसेविकांची उपस्थिती होती.
0 Comments